32 C
Mumbai
Saturday, November 2, 2024
घरविशेष'परळी सुन्न आहे, राज्याची मान खाली गेली आहे'

‘परळी सुन्न आहे, राज्याची मान खाली गेली आहे’

Google News Follow

Related

करुणा शर्मा मुंडे अटक प्रकरण सध्या महाराष्ट्रात चांगलेच गाजत आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या माजी मंत्री आणि भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सूचक वक्तव्य केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून पंकजा यांनी आपले मत मांडले आहे. पंकजा मुंडे यांनी कुठेही या प्रकरणाचा उल्लेख केला नसला तरीही त्यांच्या रोख हा याच प्रकरणाकडे आहे असे म्हटले जात आहे.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांना रविवार, ५ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्यांना अटक केली. पण या सर्व प्रकारात आपल्याला अडकवले जात असल्याचा आरोप करूणा यांनी केला आहे. पोलिस हे धनंजय मुंडे यांच्या दबावात काम करत आहेत असेही त्या म्हणाल्या आहेत. या प्रकरणात आता धनंजय मुंडे यांच्या चुलत भगिनी आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी भूमिका घेतल्याचे म्हटले जात आहे. मंगळवारी पंकजा यांनी एक सूचक असे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये कुठेही धनंजय मुंडे, करुणा मुंडे किंवा या घटनेचा उल्लेख नसला तरीही पंकजा यांचा निशाणा याच घटनेकडे असल्याचे म्हटले जात आहे. ‘परळी सुन्न आहे, राज्याची मान खाली गेली आहे’ असे पंकजा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तर ‘राज्यात चुकीचा पायंडा पडू नये’ असेही त्या म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

कोरोना काळात फुलविक्रेत्यांचे चेहरे कोमेजले!

५० कोटींचा दावा खुशाल टाकावा, मी घाबरत नाही

शार्दूल ठाकूरवर अन्याय झाला का?

मेहबूब सारखे बलात्कारी मोकाट वावरत असल्याने विकृत निर्ढावलेले

काय आहे प्रकरण?
करुणा शर्मा मुंडे या रविवारी परळी येथे दाखल झाल्या. त्या प्रसिद्ध अशा वैजनाथ मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जात होत्या. यावेळी शहरात एकच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी करुणा यांना मंदिरात जाण्यापासून रोखले. त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. यामुळे परिसरातील वातावरण खूपच तणावपूर्ण झाले होते.

या घटनेनंतर पोलिसांनी करूणा यांना बाहेर काढले. त्यांना स्थानिक पोलिस स्थानकात आणण्यात आले. पण त्याचवेळी करूणा यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यांच्या गाडीत पिस्तुल सापडले. हे पिस्तूल करुणा यांनी बेकायदेशीरपणे बाळगल्याचा ठपका ठेवत त्यांना पोलिसांनी अटक केली. पण आपल्याला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप करुणा यांनी केला. तर त्यांच्या गाडीत संशयास्पद रित्या कुणीतरी बंदूक ठेवल्याचेही म्हटले जात आहे. तसे व्हिडिओ माध्यमे आणि समाज माध्यमांवर फिरताना दिसत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा