25 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषहे अटल बिहारी वाजपेयी नाहीत .. पंकज त्रिपाठी आहेत

हे अटल बिहारी वाजपेयी नाहीत .. पंकज त्रिपाठी आहेत

चाहत्यांनी दिली पसंतीची पोचपावती

Google News Follow

Related

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची ९८ वि जयंती देशभरात साजरी केली जात आहे. या जयंतीचे औचित्य साधत निमित्ताने अटलजींच्या जीवनचरित्रावर बनत असलेल्या ‘मैं अटल हूं’ या चित्रपटाची पहिली झलक बघायला मिळत आहे. अभिनेता पंकज त्रिपाठीला या चित्रपटात अटल बिहारी वाजपेयींची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. चित्रपटातील त्यांचा अटलजीचा हुबेहूब लुक सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे.

अटलबिहारी वाजपेयी यांची जयंतीच्या दिवशी पंकज त्रिपाठी यांनी आपण लवकरच त्यांच्या बायोपिकमध्ये अटल बिहारींची भूमिका साकारताना दिसणार आहे. आपण या भूमिकेसाठी खूप उत्सुक आहोत आणि ही आपल्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक भूमिका असल्याचे त्रिपाठी यांनी सोशल मीडियावर जाहीर केले आहे.

‘मैं अटल हूं’ साठी अटल बिहारी वाजपेयी यांची व्यक्तीरेखा साकारण्यासाठी त्रिपाठी यांनी सर्वात आधी अटलजी यांच्यासारखे दिसण्यावर खूप मेहनत घेतली असल्याचे बघायला मिळत आहे. या मेकअपसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. पंकजची ही खास प्रतिमा तयार करण्यासाठी भानुशाली स्टुडिओ आणि लिजेंड स्टुडिओ या चित्रपटाच्या निर्मिती संस्थाच्या दिग्गज कलाकारांची मदत घेतली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पंकजला हा लूक देण्यासाठी अनेक महिने सराव केला आहे.

अभिनेता पंकज त्रिपाठी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातात . पडद्यावर भूमिका साकारताना त्यात ते जीव ओततात. बॉलीवूड असो वा ओटीटी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा विचार केला तर पंकज त्रिपाठी या यादीत अग्रस्थानी आहेत. याच कारणामुळे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याचा विचार आला तेव्हा चित्रपट निर्मात्यांच्या मनात पंकज त्रिपाठी हे एकच नाव आले .

हे ही वाचा : 

माजी सैनिकांचे टेन्शन दूर, आता मिळणार पेन्शन

पाकिस्तान विकणे आहे !

५४ वर्षांपूर्वी याच दिवशी मानव प्रथमच चंद्राच्या कक्षेत

मोदी सरकारची गरिबांना नववर्षाची भेट

हा बायोपिक मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव दिग्दर्शित करत आहेत. चित्रपटाची कथा ‘द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिक्स अँड पॅराडॉक्स’ या पुस्तकावर आधारित असेल. हा चित्रपट पुढील वर्षी अटलबिहारी वाजपेयींच्या वाढदिवसाला म्हणजेच २५ डिसेंबर २०२३ ला प्रदर्शित होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा