23.4 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषव्हाईट हाऊसमध्ये चक्क पाणीपुरी, सामोसे आणि भारतीय मिठाई!

व्हाईट हाऊसमध्ये चक्क पाणीपुरी, सामोसे आणि भारतीय मिठाई!

सारे जहाँ से अच्छा...गाणे वाजवून केले स्वागत

Google News Follow

Related

व्हाईट हाऊसच्या मरीन बँडने एका रिसेप्शनमध्ये ‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा’ हे लोकप्रिय भारतीय देशभक्तीपर गीत वाजवले. रिसेप्शनमध्ये पाणीपुरी, सामोसा आणि भारतीय मिठाई यासह भारतीय स्ट्रीट फूड देखील देण्यात आले. व्हाईट हाऊसमध्ये ‘सारे जहाँ से अच्छा’ हे गाणे वाजवण्याची ही वर्षभरातील दुसरी वेळ होती. २३ जून २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान हे गाणे वाजवण्यात आले होते. यातून भारत-युएस संबंध मजबूत असल्याचे दिसून येते असे भारतीय-अमेरिकन समुदायाचे नेते अजय जैन भूटोरिया यांनी सांगितले.

AANHPI हेरिटेज मंथ साजरे करताना अध्यक्ष जो. बिडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या समवेत झालेल्या स्वागत समारंभात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान मोहम्मद इक्बाल यांनी लिहिलेले ‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा’ हे गाणे व्हाईट हाऊसच्या मरीन बँडने दोनदा वाजवले. वार्षिक कार्यक्रमासाठी राष्ट्रपतींनी आमंत्रित केलेल्या भारतीय अमेरिकन लोकांनी विनंती केली होती, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.

हेही वाचा..

नांदेडच्या छापेमारीत ८ किलो सोनं, १४ कोटींची रोकड अशी १७० कोटींची मालमत्ता जप्त!

२०१९, २०२४च्या मतदानपद्धतीत कोणतीही उलथापालथ नाही! गुप्ता यांचे स्पष्टीकरण

घाटकोपर होर्डिंग प्रकरणात लोहमार्ग पोलीस ही तेवढेच जबाबदार

बांगलादेशची पाकिस्तानच्या दिशेने वाटचाल!

याबद्दल बोलतना भूटोरिया म्हणाले, आपण व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करताना ‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा’ वाजवत संगीतकारांनी माझे स्वागत केले. रिसेप्शनमध्ये भारतीय स्ट्रीट फूड, त्यात पाणीपुरी, मिठाईची समावेश होता. व्हाईट हाउसच्या मेनूमध्ये अलीकडेच भर पडली आहे ती सामोस्यांची. सोमवारी संध्याकाळी व्हाईट हाऊसच्या रोज गार्डनमध्ये एएएनएचपीआयच्या स्वागत समारंभात सहभागी झाल्यानंतर भुतोरिया यांनी पीटीआयला सांगितले.
भुतोरिया यांनी व्हाईट हाऊसच्या कार्यकारी शेफ क्रिस्टेटा कॉमरफोर्ड यांची भेट घेतली आणि कार्यक्रमादरम्यान तिला पाणीपुरीबद्दल विचारले होते. त्यावेळी तिने आपण इथे पाणीपुरी बनवली असल्याचे सांगितले.

अमेरिकेतील पाणीपुरीची वाढती लोकप्रियता हे अमेरिकन अधिकारी भारतात आल्यानंतर येथे स्ट्रीट फूडचा आस्वाद घेत असल्यामुळेच आहे, असे भुतोरिया यांचे मत आहे. अमेरिकन प्रशासनातील अनेक अधिकारी, मग ते परराष्ट्र विभागाचे अधिकारी असोत किंवा व्हाईट हाऊसचे ते अनेक वेळा भारतात आले आहेत. त्यावेळी तेथे भारतीय पाणीपुरीची जास्त चर्चा होते. पाहुण्यांमध्ये कोविड विरुद्धच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे यूएस सर्जन जनरल डॉ. विवेक मूर्ती यांच्यासह अनेक आशियाई अमेरिकन आणि अनेक भारतीय अमेरिकन लोकांचा समावेश होता. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी ढोल वाजवून शेकडो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. भारतीय अमेरिकन सर्जन जनरलने काही मिनिटांसाठी त्यांचे ड्रमिंग कौशल्य दाखवले.

मे महिना आशियाई अमेरिकन, नेटिव्ह हवाईयन आणि पॅसिफिक आयलँडर (AANHPI) हेरिटेज महिना म्हणून साजरा केला जातो. AANHPI मध्ये सुमारे ५० वांशिक गट आणि १०० भाषांचा समावेश असलेल्या मेलेनेशिया, मायक्रोनेशिया आणि पॉलिनेशियाच्या आशिया आणि पॅसिफिक बेटांमधील संस्कृतींचा समावेश आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा