पानिपत शौर्य दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस आज (१४ जानेवारी) पानिपतमध्ये दाखल झाले. मराठ्यांनी लढलेल्या वीर भूमीला त्यांनी वंदन केले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंत राव चव्हाण, यांच्यानंतर शौर्य दिनानिमित्त येणारे दुसरे मुख्यमंत्री फडणवीस आहेत. या मंगल भूमीला वंदन करण्याकरिता येण्याची संधी मिळाली, हे माझे सौभाग्य असून इथून पुढे जेव्हा संधी मिळेल तेव्हा येत जाईन, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पानिपत ही मराठी माणसाची भळभळती एक जखम आहे आणि मराठी माणसाचा अभिमान देखील आहे. ज्या प्रकारे मराठ्यांनी पानिपतच्या लढाईत शौर्य दाखवले. अतिशय विपरीत परिस्थितीत ज्या प्रकारे मराठे लढले, युध्याच्या इतिहासातील ही अत्यंत मोठी गोष्ट आहे. अनेक मराठे सैनिक वीर गतीला प्राप्तझाल्यानंतरही मराठ्यांनी कधी हार मानली नाही. त्यानंतर १० वर्षामध्ये पुन्हा संपूर्ण भारतावर मराठ्यांनी भगवे राज्य प्रस्थापित केले आणि दिल्ली देखील जिंकून दाखविली.
हे ही वाचा :
शिक्षण विभागाच्या योजना मिशन मोडवर राबवा
निर्णयांची माहिती लोकांपर्यंतपोहोचविण्यासाठी एआय तंत्राचाही वापर
महाकुंभ मेळाव्यात सहभागी होता येणं हे भाग्यचं!
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरु केलेल्या हिंदवी स्वराज्याला संपूर्ण भारतामध्ये पसरवण्याचे काम मराठ्यांनी केले. त्यात पानिपत एक अशा प्रकराची लढाई आहे. ज्या लढाईमध्ये जरी तांत्रिक दृष्ट्या पराजय झाला तरी मराठे कधीच हारले नाहीत आणि त्यांनी आपले शौर्य इतके वाढवले कि त्यानंतर भारतावर अशा प्रकारचे आक्रमण करण्याचे कोणी धाडस केले नाही.
ते पुढे म्हणाले, या शौर्य भूमीला वंदन करण्यासाठी आम्ही आलो आहोत. आमचा इतिहास जिवंत ठेवण्याचे काम केल्याबद्दल शौर्य भूमीचे ट्रस्टचे अभिनंदन आणि आभार. मार्तुभूमी करिता धारतीर्थ पडलेल्या मराठ्यांना या ट्रस्टच्या-कार्यक्रमाच्या माध्यमातून सातत्याने आदरांजली देण्याचे काम चालते. इथला परिसर आणि इथले स्मारक याला अधिक चांगले करण्याकरिता महाराष्ट्र सरकार पुढाकार घेईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.