दिल्ली उच्च न्यायालयाने बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांना आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी दिलेल्या सवलतीमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला, शनिवारी इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये निवड चाचणी झाली. त्यात विनेश फोगट हिच्या महिला फ्रीस्टाइल ५३ किलो वजनी गटातील सहकारी कुस्तीपटू अंतिम पंघल हिने चाचणी जिंकली. त्यामुळे ती आता एशियाडसाठी ‘स्टँडबाय’ म्हणून पात्र ठरली आहे. विनेशने एशियाडमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास अंतिम देशाचे प्रतिनिधित्व करेल.
महिला आणि ग्रीको-रोमन श्रेणीकरिता कुस्ती पथक निवडण्यासाठी चाचण्या भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने आयोजित केल्या होत्या. सध्या या समितीला कुस्तीमहासंघाचे दैनंदिन व्यवहार चालविण्याचे काम देण्यात आले आहे. पुरुष फ्रीस्टाइल संघ निवडण्यासाठी चाचण्या रविवारी होतील, त्यानंतर आयओए भारतीय कुस्तीपटूंच्या अंतिम प्रवेशिका एशियाडच्या आयोजन समितीकडे पाठवेल.
बजरंगच्या पुरुषांच्या ६५ किलो वजनीगटात होणाऱ्या चाचणीचा विजेता त्याचा स्टँडबाय असेल. महिला विभागातील चाचण्यांमध्ये ५७ किलो गटात दोन निराशाजनक कामगिरी झाल्या. जागतिक चॅम्पियनशिपच्या पदकविजेत्या अंशू मलिक आणि सरिता मोर बाद झाल्या. पहिल्या फेरीत अंशूला मोरकडून ४-६ असा पराभव पत्करावा लागला आणि पुढच्या फेरीत मानसीने ९-६ असा पराभव केला. कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंग सिंग यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या साक्षी मलिक आणि संगीता फोगट या चाचण्यांमध्ये दिसल्या नाहीत. त्यामुळे त्यांना एशियाडमध्ये खेळता येणार नाही. त्यांना समितीने चाचण्यांमधून सूट दिली नव्हती.
हे ही वाचा:
पाकिस्तानच्या सीमा हैदरला हवे भारतीय नागरिकत्व !
न्यायाधीशांचा कुत्रा हरवला; सुरक्षा कर्मचाऱ्याला निलंबित करा!
अमित ठाकरेंकडून टोल घेतल्यामुळे मनसैनिकांनी फोडला टोलनाका
महिला अत्याचाराचे राजकारण करणारे नेते की गिधाडे?
निकाल: महिला फ्रीस्टाइल: ५० किलो: पूजा गहलोत (दिल्ली), स्टँडबाय निर्मला (हरियाणा); ५३ किलो: स्टँडबाय अंतिम पंघल (हरियाणा), मंजू (हरियाणा); ५७ किलो: मानसी (हरियाणा), स्टँडबाय सितो (हरियाणा); ६२ किलो: सोनम मलिक (हरियाणा), स्टँडबाय मनीषा (हरियाणा); ६८ किलो: राधिका (हरियाणा), स्टँडबाय प्रियांका (हरियाणा); ७६ किलो: किरण (हरियाणा), स्टँडबाय दिव्या (उत्तर प्रदेश) पुरुष ग्रीको-रोमन: ६० किलो: ज्ञानेंद्र (एसएससीबी), विक्रम कुराडे (आरएसपीबी); ६७ किलो: नीरज (एसएससीबी), अंकित गुलिया (एसएससीबी); ७७ किलो: विकास (आरएसपीबी), करण (दिल्ली); ८७ किलो: सुनील कुमार (आरएसपीबी), मनोज कुमार (हरियाणा); ९७ किलो: नरिंदर चीमा (पंजाब), नितेश (हरियाणा); १३० किलो: नवीन (एसएससीबी), प्रवेश (हरियाणा).