24 C
Mumbai
Tuesday, December 17, 2024
घरविशेषसोशल मीडियात हार्दिक पंड्यावर का होतोय हल्ला?

सोशल मीडियात हार्दिक पंड्यावर का होतोय हल्ला?

पंड्यावर सोशल मीडियावर स्वार्थी असल्याची टीका

Google News Follow

Related

वेस्ट इंडिज-भारत यांच्यातील टी-२० मालिकेतील तिसरा सामना भारताने सहज जिंकून मालिकेतील आपले आव्हान कायम राखले आहे. भारताला विजयासाठी १४ चेंडूत अवघ्या दोन धावांची गरज असताना कर्णधार हार्दिक पंड्याने धोनी स्टाइलने गगनचुंबी षटकार हाणून भारताला विजय मिळवून दिला.  

मात्र या षटकाराने तिलक वर्माची सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकाची संधी त्याने हिरावून घेतली. त्यावेळेस तिलक वर्मा ४९ धावांवर नाबाद होता. भारताला विजयासाठी २४ चेंडूत १२ धावांची गरज असताना तिलक वर्माने स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी चेंडू बॅटवर आला नाही. त्यावेळेस हार्दिकने सामना संपवावा लागेल, नाबाद राहिल्याने फरक पडतो, असा सल्ला दिला. त्यानंतर तिलकने संयमाने फलंदाजी केली. 

१८ व्या षटकातही दोघांमध्ये संभाषण झाले. भारताला १७ चेंडूत ५ धावा हव्या होत्या. तिलक वर्मा ४७ धावांवर आपली खेळी संयमाने करत होता. त्यावेळेस, वर्माने हार्दिकला विचारले, एक धाव काढायची का? यावर हार्दिक म्हणाला, तुझी इच्छा. यानंतर पुढच्या तीनही चेंडूंवर एक धाव घेण्यात आली. मात्र पुढच्याच चेंडूवर हार्दिकने खणखणीत षटकार खेचला, भारत जिंकला मात्र तिलक वर्मा ४९ धावांवर नाबाद परतला.

हेही वाचा :

धर्मवीर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार

“आय विल किल नरेंद्र मोदी अल्सो” उल्लेख असलेला धमकीचा मेल

खोट्या बातम्या पसरवणाऱ्या आठ युट्युब चॅनल्सवर बंदी

‘भारतमातेची हत्या झाल्याच्या राहुल गांधी यांच्या उल्लेखावर काँग्रेसने टाळ्या वाजवल्या!’

याच हार्दिक पंड्याने तिलक वर्माला सांगितले होते, शेवटपर्यंत थांब, संपवून जा आणि तो संयमाने ४९ धावांवर असताना, २ धावा शिल्लक असताना स्वतः मात्र षटकार ठोकला. याआधीही हार्दिक पंड्या दोनवेळा खराब फटका मारताना बालमबाल बचावला होता.  

हार्दिकच्या या कृतीमुळे तिलक वर्माचे अर्धशतक एका धावाने हुकल्यामुळे सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी त्याचा खरपूस समाचार घेतला आहे. त्याची ही कृती किती चुकीची होती, त्याच्या उदाहरणासहीत युजर्सने त्याला खडेबोल सुनावले आहेत. यासाठी महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहलीचे व्हिडिओ दाखवले आहेत. त्यांनी कसे नॉन स्ट्राइकला असलेल्या फलंदाजाचे शतक पूर्ण होण्यासाठी जी खिलाडीवृत्ती दाखवली, त्याचे उदाहरण देण्यात आले आहे. धोनी आणि कोहलीसोबत खेळूनही काही शिकला नाहीस, पंड्या स्वार्थी असल्याची क्रिकेटप्रेमींनी टीका केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा