राज्यात आता पांडुरंगाची ‘शिवसेना’

महाडमध्ये जन्म झाला या शिवसेनेचा

राज्यात आता पांडुरंगाची ‘शिवसेना’

महाराष्ट्रातील राजकारणात शिवसेनेमध्ये मोठी फूट पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट तयार झाले. एकनाथ शिंदे यांचा गट आणि उद्धव ठाकरे यांचा गट. खरी शिवसेना कोणाची? यावरून दोघांमधला संघर्ष टोकाला गेला. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. आमचीच खरी शिवसेना यासाठी दोन्ही गटाकडून खटाटोप करण्यात आला. कोण सच्चा कोण झुठ्ठा याकरीता कोर्टाच्या पायऱ्या चढल्या गेल्या. पुरावे सादर केले. परंतु, आता आणखी एक तिसरी शिवसेना महाराष्ट्रात जन्मली आहे. महाराष्ट्रातील ही शिवसेना आता पांडुरंगाची ‘शिवसेना’ या नावाने ओळखली जाणार आहे.

हेही वाचा :

मुकेश अंबानी झाले पुन्हा आजोबा

श्रद्धाचे कापलेले डोके दिल्ली महापालिकेच्या या तलावात आहे का?

रविवारी सूर्या चमकला, कीवींचा पराभव झाला

शिवसेना ना तुमची ना यांची सांगून कोर्टाने आणि निवडणूक आयोगाने निर्णय राखून ठेवला. त्यातच निवडणूक आयोगाने अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीत शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह गोठवण्याचा अंतरिम निर्णय घेतला. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आणि उद्धव ठाकरे गटाने ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव मिळाले. परंतु आता राज्यात आणखी एक शिवसेनेचा जन्म झालाय. हे ऐकून चक्रावलात ना.

तर झाले असे, महाड तालुक्यातील किये-गोठवली येथील पांडुरंग वाडकर यांच्या पत्नीने कन्यारत्नाला जन्म दिला. १७ नोव्हेंबर हा बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन. याच दिवशी आपल्या कन्येच्या नामकरण विधीचे आयोजन पांडुरंग यांनी केले. बाळाला पाळण्यात घालण्यात आले. मावशीने मुलीच्या कानात नाव सांगितले आणि नावापुढचा पडदा हटवला गेला. बाळासाहेबांच्या कट्टर असलेल्या या शिवसैनिकाने आपल्या मुलीचे नाव चक्क ‘शिवसेना’ असे ठेवले होते.  त्यामुळे या निष्ठेची राज्यात एकच चर्चा रंगली आहे. त्यांनी ठेवलेल्या या नावाची राज्यात जोरदार चर्चा रंगली आहे. वाडकर हे उपसरपंचदेखील आहेत.

Exit mobile version