पंडित राजन मिश्र यांचे निधन

पंडित राजन मिश्र यांचे निधन

हिंदुस्थानी शास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध असणारे वाराणसीचे पंडित राजन मिश्र यांचे रविवारी निधन झाले. राजधानी दिल्लीत त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यानच त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले. मिश्र यांच्या निधनाबद्दल हिंदुस्थानी संगीताच्या चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे.

१९५१ साली राजन मिश्र यांचा जन्म वाराणसी येथील एका संगीत घराण्यात झाला. लहानपणापासूनच त्यांच्यावर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे संस्कार झाले. ख्याल गायकीसाठी ते विशेष प्रसिद्ध होते. त्यासोबतच त्यांनी टप्पा,ठुमरी हे गायन प्रकारही हाताळले. राजन मिश्र आणि त्यांचे बंधू साजन मिश्र यांची संगीत जोडी अतिशय लोकप्रिय होती. संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्या दोघांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

हे ही वाचा:

अमेरिका पाठवणार कोविड लसीचा कच्चा माल

लसीकरणाच्या घोषणेची ‘मोफत’ डोकेदुखी

५५१ ऑक्सिजन प्लॅन्ट्स उभारायला मोदी सरकारची मंजुरी

बीपीसीएल परिसरात जम्बो कोविड सेंटरला मोदी सरकारची परवानगी

मिश्र यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून मोदींनी मिश्र यांना आदरांजली वाहिली. मिश्र यांच्या जाण्याने अतिशय दुःख झाले आहे असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बनारस घराण्याच्या मिश्र यांचे जाणे ही कला आणि संगीत क्षेत्राची कधीही भरून न निघणारी पोकळी आहे असेही ते म्हणाले.

Exit mobile version