29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषमहान दूरदर्शी व्यक्तिमत्व पंडित दीनदयाळ उपाध्याय

महान दूरदर्शी व्यक्तिमत्व पंडित दीनदयाळ उपाध्याय

अखंड मानवता दिवस म्हणून पंडित दीनदयाळ शर्मा यांना विनम्र अभिवादन

Google News Follow

Related

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशी ज्यांची ओळख होती ते म्हणजे एक उत्कृष्ट संघटक, लेखक, पत्रकार , थोर विचारवंत , तत्ववेत्ते, एक हुशार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असलेले पंडित दीनदयाळ शर्मा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ते सामील झाल्यानंतर भारतीय जनसंघाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली. त्यांनी १९५१ पासून १९६७ पर्यंत हे पद सांभाळले. तर २९ डिसेंबर १९६७ रोजी ते जनसंघाचे अध्यक्ष बनले.  ११ फेब्रुवारीला १९६८ रोजी त्यांचे आकस्मिक निधन झाले त्यांच्याच सन्मानार्थ भारत सरकारने ‘मुघलसराय’ स्थानकाचे नामकरण ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्थानक’ असे करण्यात आले आहे.

 

पंडित दीनदयाळ हे फक्त आठ वर्षांचे असताना त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले. त्यांच्या मामानेच त्यांची काळजी घेतली शिक्षणादरम्यान ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात येऊन नंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारवंत बनले. भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक झाले महात्मा गांधी आणि स्वामी विवेकानंद यांची जीवनाप्रती असलेली दृष्टी पंडित यांच्याशी जुळलेली होती. भारताला मजबूत, चैत्यनशील, स्वावलंबी बनवण्यासाठी आपल्या सांस्कृतिक सभ्यता, राष्ट्रीय मूल्ये आणि नैतिकतेवर आधारित स्वदेशी आर्थिक धोरणे स्वीकारण्याची गरज असल्याचे त्यांचे मत होते. सर्वाना सोबत घेणाऱ्या भारत देशासाठी मूल्यांवर आधारित प्रणाली आपल्याला आवश्यक आहे असे त्यांना वाटत होते.

हे ही वाचा:

आदित्य ठाकरे पोपटपंची काय करता ?

काश्मीरमध्ये आढळला देशातील पहिला लिथियमचा साठा

सागरी जैवविविधता आणि स्वच्छता मोहिमेसाठी सामंजस्य करार

इस्रोचे सर्वात लहान रॉकेट एसएसएल- डी २ अंतराळात झेपावले

पंडित दीनदयाळ उपाध्या य हे स्वदेशीचे मोठे समर्थक होते. भारतासाठी एक स्वदेशी आर्थिक मॉडेल विकसित करण्याचा त्यांचा विचार होता. पंडितजींना भारतातील गरीब आणि दलितांचा आवाज देखील म्हंटले जाते. देशातील सर्वच लोककल्याणकारी योजना या सर्व तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यांचे स्वप्नचं होते कि समाजातील शेवटच्या स्तरावरील उभ्या असलेल्या लोकांसाठी योजना असणे आवश्यक आहे. देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण म्हणूनच आपण त्यांची आठवण नेहमीच काढत राहू त्यांच्या विनम्र स्मृतींना अभिवादन.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा