30 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषदीनांचा नाथ, अंत्योदयाचा बुलंद आवाज

दीनांचा नाथ, अंत्योदयाचा बुलंद आवाज

Google News Follow

Related

एक देश में दो निशान, दो विधान, दो प्रधान नहीं चलेंगे नहीं चलेंगे नहीं चलेंगे  असा नारा देणारे भारतीय जनसंघाचे  संस्थापक अध्यक्ष डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा तुरुंगात संशयास्पद मृत्यू झाला. त्यांनी लावलेल्या जनसंघाच्या रोपट्याचा वेलू गगनावर घेऊन जाणारे आणि अंत्योदयाचा नारा देणारे दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती. आर्थिक विकासाचे प्रयत्न समाजाच्या पंक्तीत उभ्या असलेल्या शेवटच्या व्यक्तीपासून सुरू झाले पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कुवती, आवड आणि कार्यक्षमतेनुसार काम मिळाले पाहिजे, जेणेकरून त्याच्या प्राथमिक गरजांची पूर्तता करणे सोपे होईल अशी त्यांची अंत्योदया मागची भूमिका होती.

महात्मा गांधींनी देशाच्या मागासलेल्या आणि गरीब घटकांच्या उन्नतीवर आपले लक्ष केंद्रित केले. त्यांच्या नीतिमत्तेची झलक दीनदयाळ यांच्यात  दिसते.  गांधीजींनी ज्याला सर्वोदय म्हटले त्याला दिनदयाळ  यांनी  “अंत्योदय” म्हटले आणि ते या विचाराचे नेते बनले.   आर्थिक विकासाचे प्रयत्न समाजाच्या पंक्तीत उभ्या असलेल्या शेवटच्या व्यक्तीपासून सुरू झाले पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कुवती, आवड आणि कार्यक्षमतेनुसार काम मिळाले पाहिजे, जेणेकरून त्याच्या प्राथमिक गरजांची पूर्तता करणे सोपे होईल अशी त्यांची अंत्योदयामागची भूमिका होती.

अर्थाचा अभाव जितका जास्त हानिकारक तितकाच अर्थाचा प्रभाव जास्त हानिकारक आहे. या दोन्ही परिस्थिती समाज आणि देशासाठी घातक आहेत. असा त्यांचा विश्वास होता. दरिद्र नारायण ते अंत्योदय हा प्रवास भारतीय अध्यात्मिक विचारांचा प्रवास आहे, जो नेहमीच भारतीय संस्कृतीचा मूळ मंत्र राहिला आहे. सबका साथ, सबका विकास ही संकल्पना पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारधारेवर आधारित असून, ती पुढे नेत भाजप सरकारमध्ये समाजातील गरीब, मागासलेल्या लोकांसाठी अनेक योजना राबवण्यात आल्या.

उपाध्यायजींच्या मते, समाजवादी आणि भांडवलवादी विचारधारा केवळ मानवी शरीर आणि मनाच्या गरजा लक्षात घेतात. त्यामुळे त्या भौतिकवादी उद्दिष्टावर आधारित असतात. तर मनुष्याच्या पूर्ण विकासासाठी आध्यात्मिक विकासही तितकाच आवश्यक असतो. अखंड मानवतावाद ही एक विचारधारा आहे ज्यामध्ये व्यक्ती, नंतर व्यक्तीशी संबंधित कुटुंब, नंतर कुटुंबाशी संबंधित समाज, राष्ट्र, जग आणि नंतर अनंत विश्वाचा समावेश होतो. सगळे एकमेकांशी जोडून आपले अस्तित्व टिकवून ठेवतात असं त्यांच स्पष्ट मत होतं .

पंडित दीनदयाळ उपाध्याय हे बहुआयामी व्यक्तिमत्वाने समृद्ध होते, ज्यात कुशल विचारवंत, संघटक, शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक, राजकारणी, वक्ता, लेखक, साहित्यिक आणि पत्रकार यांचा समावेश होता. पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जन्म २५ सप्टेंबर १९१६ रोजी उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील नागला चंद्रभान या छोट्याशा गावात झाला. त्यांचे बालपण खूप संकटात गेले. १९३७ मध्ये त्यांनी इंटरमिजिएट परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून विक्रम केला. त्यांनी कानपूरच्या एस डी कॉलेजमध्ये बीए पूर्ण केले.येथेच त्यांना सुदरसिंह भंडारी, नानाजी देशमुख यांसारख्या अनेक व्यक्ती भेटल्या, ज्यांना भेटल्यानंतर त्यांना देशसेवेचा विचार आला. प्रशासकीय परीक्षा उत्तीर्ण होऊनही रस नसल्यामुळे नोकरी न मिळाल्याने ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करू लागले.पंडित दीनदयाळ उपाध्याय हे आयुष्यभर साहित्याशी जोडलेले होते.

भारतीय जनसंघाची स्थापना डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी १९५१ साली केली आणि दीनदयाळ उपाध्याय यांची प्रथम सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. डिसेंबर १९६७ पर्यंत ते जनसंघाचे सरचिटणीस होते.  प्रारंभीच्या  काळात  लोकसभा निवडणुकीसाठी  पणती  हे निवडणूक चिन्ह होते. निवडणुकीत उभे राहिले की पडणार हे माहित असताना देखील पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहचवणे या  एकाच भावनेतून प्रचारात उतरले जायचे. निवडणूक प्रचारात उतरणाऱ्यांच्या मनात  हीच  पणती  सतत पेटत ठेवण्याचं काम दिनदयाळ उपाध्याय यांनी केलं . त्यांची कार्यक्षमता, बुद्धिमत्ता आणि परिपूर्णता या गुणांनी प्रभावित होऊन डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी ‘माझ्याकडे दोन दीनदयाळ असतील तर मी भारताचा राजकीय चेहरा बदलू शकतो’. असं त्यांच्याबद्दल अभिमानानं म्हटलं होतं

दीनदयाळ उपाध्याय एकदा आपल्या  भाषणात ते म्हणाले होते की, माझ्याकडेही एखाद्या मोठ्या नेत्यासारखा स्वीय सचिव आणि अंगरक्षक असेल तर मी खरोखरच गरीब जनतेचा प्रतिनिधी म्हणवून घेण्यास पात्र होईल का? जोपर्यंत या सर्व सुविधा राज्यस्तरीय कार्यकर्त्यांना मिळत नाहीत, तोपर्यंत माझे मन स्वत:साठी त्या सुविधा स्वीकारणार नाही. शिस्त, एकता आणि पक्षाच्या तसेच समाज आणि राष्ट्राच्या हितासाठी वैयक्तिक इच्छांना महत्त्व न देण्याची प्रवृत्ती जनसंघाची सर्व वैशिष्ट्ये त्यांच्या कणाकणात साठवलेली होती.

भारतीय राजकारणाचे नेते, बहुआयामी व्यक्तिमत्त्व पं. दीनदयाळ उपाध्याय, भारतीय संस्कृती आणि मूल्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आयुष्यभर लढले. अखंड मानवतावाद आणि अंत्योदयाच्या विचारांनी त्यांनी देशाला पुरोगामी विचारसरणी देण्याचे काम केले. दीनदयाळ यांनी एक उत्कृष्ट संघटक म्हणून पर्यायी राजकारणाचा पाया घातला,  देशातील गरीब, वंचित आणि शोषित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे केले. त्यांचे जीवन सामाजिक समरसतेचे आणि देशभक्तीचे अद्वितीय उदाहरण आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा