कोल्हापुरात पंचगंगेचा रेड अलर्ट !

प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

कोल्हापुरात पंचगंगेचा रेड अलर्ट !

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने कोल्हापूर शहराला पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून संपूर्ण जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पाच ते सहा दिवस सतत सुरु असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून सध्याची पातळी ४३.१ फुटावर पोहोचली आहे. जिल्ह्यातील ८३ बंधारे पाण्याखाली गेले असल्याची माहिती आहे. राधानगरी धरण १०० टक्के भरले असून धरणाचे स्वयंचलित ४ दरवाजे उघडले आहेत. राधानगरी धरणातून ७ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये सुरु झाला आहे. त्यानंतर हे पाणी पंचगंगा नदीला जाऊन मिळणार आहे.

हे ही वाचा:

कॅनडातील हिंदू खासदार चंद्र आर्य यांना खलिस्तानी दहशतवादी पन्नूकडून धमकी

पुण्यात पावसाचा हाहाःकार; शहरासह जिल्ह्यात पूरस्थिती

मुसळधार पावसामुळे मुंबईतील तलावांसह धरणात ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा

लोकसमर्थनाचं सलाईन संपलं जरांगेचं आंदोलन ढेपाळलं!

एकीकडे पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून राधानगरी धरणातून सोडलेले पाणी पंचगंगेला मिळाल्यास जिल्ह्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

Exit mobile version