पंचगंगा -अमर संदेश आणि दादोजी कोंडदेव -आदर्श अंतिम फेरीसाठी झुंजणार

ओम् श्री साईनाथ ट्रस्ट द्वितिय श्रेणी कबड्डी

पंचगंगा -अमर संदेश आणि दादोजी कोंडदेव -आदर्श अंतिम फेरीसाठी झुंजणार
पंचगंगा संघ, अमर संदेश स्पोर्ट्स, दादोजी कोंडदेव स्पोर्ट्स, आदर्श मंडळ यांनी ओम् श्री साईनाथ ट्रस्टने आयोजित केलेल्या पुरुष द्वितीय (स्थानिक) गटात उपांत्य फेरी गाठली. पंचगंगा विरुद्ध अमर संदेश आणि दादोजी कोंडदेव विरुद्ध आदर्श अशा उपांत्य लढती होतील.
 
प्रभादेवी समुद्र किनाऱ्या जवळील मंडळाच्या पटांगणार सुरू असलेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात पंचगंगा संघाने विजय बजरंग मंडळाचा १९-१५ असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. अतिशय सावधपणे खेळल्या गेलेल्या या सामन्यातील पहिल्या डावात ७-५ अशी आघाडी पंचगंगाकडे होती. रवींद्र साळुंखे, रोहित देसाई पंचगंगाकडून, तर योगेश गुरव, साहिल गावडे विजय बजरंगकडून उत्कृष्ट खेळले.
 
हे ही वाचा:
 
नवज्योत सिद्धू १० महिन्यांनी तुरुंगातून बाहेर
 
संजय राऊत याना बजावली १०० कोटींची मानहानीची नोटीस
 
अजित पवार न्यायालयापेक्षा मोठे झाले का?
 
स्थापना दिवस साजरा करण्यासाठी भाजपची जोरदार तयारी सुरु
 
अमर संदेश स्पोर्ट्सने श्री साई क्लबचा अत्यंत चुरशीच्या लढतीत २९-२५ असा पाडाव करीत आगेकूच केली. विश्रांतीपर्यंत एकमेकांचा अंदाज घेत सावध खेळ करणाऱ्या या सामन्यात ११-०९ अशी अमर संदेशकडे आघाडी होती. विश्रांतीनंतर सामन्यातील चुरस अधिकच वाढली. त्यात अमर संदेशने ४गुणांनी बाजी मारली. विकास गुप्ता, करण रावत, अभिषेक पाल यांच्या चतुरस्त्र खेळाला अमर संदेशच्या विजयाचे श्रेय जाते. श्री साईच्या तेजस गायकवाड, राकेश म्हात्रे, संदेश पाटील यांच्या उत्कृष्ट खेळ संघाला विजयी करण्यास थोडा कमी पडला.
 
दादोजी कोंडदेव स्पोर्ट्सने प्रशांत पाटील, यश पाटील यांच्या झंजावाती खेळाने सूर्यकांत मंडळाचा प्रतिकार ३१-२० असा मोडून काढला. पहिल्या डावात १६-०९ अशी आघाडी विजयी संघाकडे होती. मंदार ठोंबरे, साईल खरे पराभूत संघाकडून उत्तम खेळले.
 
शेवटच्या सामन्यात आदर्श मंडळाने समर्थ स्पोर्ट्सचे आव्हान ३१-१९ असे परतवून लावले. पूर्वार्धात १६-०८ अशी आघाडी घेणाऱ्या आदर्शने उत्तरार्धात मात्र सावध खेळ करीत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सुशील वाडकर, दिनेश माळी, रोशन पाटील यांच्या चढाई-पकडीच्या उत्तम खेळाला या विजयाचे श्रेय जाते. साई पाटील, महेश बावदाने समर्थ कडून बरे खेळले.
Exit mobile version