पालघर जिल्हा परिषद राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हबीब शेख याना अटक !

१० कोटींच्या कामांमध्ये फसवणुकीचा आरोप

पालघर जिल्हा परिषद राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हबीब शेख याना अटक !

पालघर जिल्ह्या परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सदस्य हबीब शेख यांना दहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पालघर पोलिसांनी अटक केली आहे.खासदार राजेंद्र गावित यांच्या नावाने बनावट लेटर पॅड तयार करून त्यावर बनावट सह्या करून तब्बल दहा कोटी रुपयांची कामं मंजूर केल्याप्रकरणी खासदार राजेंद्र गावीत यांनी शेख यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली असून पालघर पोलिसांनी शेख याना अटक केली आहे.

हबीब शेख हे पालघर जिल्हा परिषदेच्या मोखाडा तालुक्यातील आसे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य असून जव्हार अर्बन बँकेचे चेअरमन आणि निलेश सांबरे यांचे समर्थक म्हणून ओळख जातात.मात्र, शासनाची दहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पालघर पोलिसांनी काल (शनिवारी) रात्री अटक केली आहे.

प्रकरण असे आहे की, मोखाडा विभागातील मोखाडा, खोडाळा ,विहीगाव राज्यमार्ग ७८ रस्त्यांसाठी खासदार यांनी मागणी केली होती. त्यानंतर शासनाकडून १० कोटीच्या निधीची मंजुरी मिळाली होती. या कामाच्या मंजुरी करता सार्वजनीक बांधकाम विभागाकडे खासदारांनी विचारणा केली असता मंजुर झालेल्या कामाचा पाठपुरावा आणि त्याकरता लागणारी कागदपत्रे जिल्हा परिषद सदस्य हबीब शेख यांनी सादर केल्याचे खासदारांना सांगण्यात आले.

हे ही वाचा:

लडाखमध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात; ९ जवानांचा मृत्यू !

रशियाच्या ‘लुना २५’ चांद्रयानात तांत्रिक अडथळा !

निवडणुकांची भीती नेमकी कोणाला?

छगन भुजबळ ब्राह्मणांवर घसरले!

या प्रकरणी पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी चौकशी केली असता, शेख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काही कामासाठी सादर केलेली कागदपत्रे ही बनावट असल्याचे समोर आले. हबीब शेख यांनी बनावट लेटरहेड तयार करून त्यावर राजेंद्र गावित यांच्या बनावट सहीचा चुकीचा वापर केला. विशेष म्हणजे, या बनावट सहीवर मुख्यमंत्री कार्यालयाची टिपणी असल्याचे समजते. त्यामुळे लोकप्रतिनिधींची आणि सरकारची दिशाभूल करून शासनाची १० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खासदार राजेंद्र गावित यांनी पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी हबीब शेख यांच्यावर पालघरमध्ये गुन्हा दाखल करून काल रात्री त्यांना अटक केली आहे. हबीब शेख सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

Exit mobile version