पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये मंगळवारी (११ मार्च) बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) जाफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण केले. या एक्स्प्रेसमध्ये ४०० हून अधिक प्रवासी होते, ज्यामध्ये अनेक लष्करी कर्मचारी होते. पाकिस्तानमधील बातम्यांनुसार, सुरक्षा दलांनी कारवाई करत १५५ प्रवाशांना कैदेतून वाचवले आहे आणि या मोहिमेत बीएलएच्या २७ सदस्यांना ठार केले. याच दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी भारतावर निराधार आरोप केले आहेत. बंडखोरांकडून ट्रेनचे अपहरण रोखण्यात आलेले अपयश लपविण्यासाठी, त्यांनी कोणत्याही पुराव्याशिवाय बलुच बंडखोरांना भारताकडून पाठिंबा मिळत असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानच्या डॉन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले. बीएलएला अफगाणिस्तानमधील तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) कडून मदत मिळत आहे का? आणि त्यांचे एकमेकांशी काही संबंध आहेत का?, असा सवाल त्यांना विचारण्यात आला होता.
यावर उत्तर देताना राणा सनाउल्लाह म्हणाले, भारत हे करत आहे, यात काही शंका नाही. भारत मदत करत आहे आणि त्यांना अफगाणिस्तानमध्ये सुरक्षित आश्रय मिळाला आहे. तेथे बसून ते सर्व प्रकारचे नियोजन करतात. पाकिस्तानचे हे शत्रू आहेत, याबद्दल काही शंका नाही. लोकांना मारणे, लुटणे हे त्यांचे एकमेव ध्येय आहे, असे राणा सनाउल्लाह म्हणाले.
हे ही वाचा :
संथाल परगण्यात आदिवासी संख्या घटली मुस्लीम संख्या वाढली
जन्म – मृत्यूच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप
5G सेवा आता ७७६ पैकी ७७३ जिल्यांमध्ये उपलब्ध
जम्मू-काश्मीर: राजौरीमध्ये सीमेपलीकडून गोळीबार, भारतीय लष्कराचा एक जवान जखमी!
सनाउल्लाह पुढे म्हणाले, ‘अफगाणिस्तानात तालिबान येण्यापूर्वी त्यांच्याकडे कोणत्याही सुविधा नव्हत्या मात्र, आता त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळत आहेत, ज्यामध्ये आर्थिक मदत, सीमा ओलांडण्याची आणि कारवाई करण्याची मुभा मिळत आहे. पाकिस्तानमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती अफगाणिस्तानात अशा सरकारच्या उपस्थितीमुळे आहे जी त्यांना हल्ल्यांचे नियोजन करण्यासाठी जागा आणि पैसा देत आहे.
کیا ٹی ٹی پی کے خوارج اور بی ایل اے کے دہشتگردوں کے آپس میں nexus ہیں ؟ عادل شاہ زیب
جی ان دونوں کی backing انڈیا کر رہا ہے اور ان کو افغانستان جیسی safe heaven دستیاب ہے۔ افغانستان میں ان کو کمین گاہیں دستیاب ہونے سے ان کی کاروائیوں میں اضافہ ہوا ہے ۔ یہ کمین گاہیں طالبان کے… pic.twitter.com/HTAXd1IUMi
— Adil Shahzeb (@adilshahzeb) March 11, 2025