२२ जानेवारीच्या सोहळयाला अगदी काही दिवस शिल्लक आहे. सोहळ्याच्या विधीला सुरुवात झाली असून प्रभू रामाची मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात आली आहे.देश आणि जगाच्या नजारा अयोध्यावर खिळल्या आहेत.यावेळी पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाही खूप आनंदी दिसत आहे.
शिल्पकार अरुण योगिराज यांनी बनविलेली प्रभू रामलल्लाची ५१ इंची मूर्ती गुरुवारी काही विधींसाठी गर्भागृहात स्थानापन्न करण्यात आली होती.त्यानंतर राम मंदिरातील रामलल्लाची पहिली झलक समोर आली. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियानेही प्रभू रामांच्या नवीन मूर्तीचा फोटो शेअर केला आहे.फोटो शेअर करत दानिशने लिहिले की, ‘माझा रामलल्ला विराजमान झाला आहे’.दरम्यान, प्रभू राम मंदिरावर दानिशची ही पहिलीच प्रतिक्रिया नाही.या अगोदर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दिवशी मॉरिशस सरकारने एक दिवसीय सुट्टीचे आयोजन केले होते, यावर दानिशने मॉरिशस सरकारचे आभार मानले होते.
हे ही वाचा:
मणिपूरमधील हिंसाचारात म्यानमारच्या दहशतवाद्यांचाही सहभाग?
लाइफजॅकेट न दिल्याने १४ शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
विराट कोहलीचे क्षेत्ररक्षण पाहून आनंद महिंद्राही भारावले
अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाची पहिली झलक समोर!
यापूर्वी दानिशने हातात झेंडा घेऊन फोटोही शेअर केला होता.त्याने लिहिले होते की, आमच्या राजाचे, प्रभू रामाचे मंदिर तयार होत आहे, आता केवळ ८ दिवसांची प्रतीक्षा, जय जय श्री राम म्हणा, असे दानिशने ट्विटकरत म्हटले होते.विशेष म्हणजे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सोहळ्याचे निमंत्रण नाकारले होते.यावर देखील दानिशने प्रतिक्रिया दिली.दानिशने काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णमयांची पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘होईही सोई जो राम रची राखा’.
दरम्यान, २२ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रभू रामांचा अभिषेक पार पडणार आहे.देशभरातील रामभक्त या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत.