पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान पुन्हा एकदा उघडा पडला आहे, परंतु दरवेळी प्रमाणे तेथील सरकार आपले हात झटकताना दिसत आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचे एक विधान समोर आले आहे, ज्यामध्ये ते म्हणत आहेत की पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नाही. आसिफ म्हणत आहेत की त्यांचा देश सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो. विशेष म्हणजे, त्यांनी उलट भारतावरच आरोप केले आहेत. या हल्ल्यामागे भारतातील लोकांचा हात असल्याचे आसिफ म्हणाले. ते पुढे म्हणाले की, भारतात, नागालँडपासून मणिपूर आणि काश्मीरपर्यंत, लोक सरकारच्या विरोधात आहेत.
संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले, भारत सरकार लोकांचे हक्क मारत आहे आणि त्यांचे शोषण करत आहे, म्हणूनच लोक त्यांच्या विरोधात उभे आहेत. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनीही या हल्ल्याबाबत वादग्रस्त विधान केले आणि म्हणाले की, पहलगाममध्ये घडलेल्या अशा घटनेशी आमचा काहीही संबंध नाही. मी अशा हल्ल्यांचा निषेध करतो. विशेषतः नागरिकांवर असे हल्ले होऊ नयेत.
हे ही वाचा :
पाकिस्तानला इस्रायलप्रमाणे उत्तर द्या
“जोपर्यंत इस्लाम टिकेल तोपर्यंत दहशतवाद टिकेल…” पहलगाम हल्ल्यावरून तस्लिमा नसरीन यांचा प्रहार
सहा दिवसांपूर्वी लग्न आणि दहशतवादी हल्ल्यात गमावला जीव
बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा
दरम्यान, दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एकूण २७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या नागरिकांचाही समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी संपूर्ण ठिकाणाची पाहणी करत आहेत. संपूर्ण घटना कशी घडली याची माहिती ते जाणून घेणार आहेत. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये आज शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत.
सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक सुरु आहे. सरकारमधील प्रमुख नेते, तीनही दलाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत दहशतवाद्यांविरुद्ध कोणता निर्णय घेण्यात येतो, याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.