21 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषब्रह्मोस क्षेपणास्त्र अभियंता निशांत अग्रवालच्या लॅपटॉपमधून गोपनीय डेटा मिळविण्यासाठी पाकिस्तानी हेरांकडून तीन...

ब्रह्मोस क्षेपणास्त्र अभियंता निशांत अग्रवालच्या लॅपटॉपमधून गोपनीय डेटा मिळविण्यासाठी पाकिस्तानी हेरांकडून तीन ॲप्सचा वापर!

यूपी-एटीएसचे तपास अधिकारी पंकज अवस्थी यांनी दिली माहिती

Google News Follow

Related

माजी ब्रह्मोस शास्त्रज्ञ निशांत अग्रवाल याला नुकतीच सत्र न्यायालयाने पाकिस्तानला लष्करी गुपिते पुरवल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नागपूरच्या मिसाईल असेंब्ली युनिटमध्ये काम करणाऱ्या निशांतला सन २०१८मध्ये उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने अटक केली होती. सत्र न्यायालयाने त्याला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २३५ अन्वये दोषी ठरवले. आयटी कायद्याच्या कलम ६६ (फ) चे उल्लंघन केल्याबद्दल अग्रवाल दोषी आढळला आणि परदेशी संस्थांना शस्त्रास्त्रांसंबंधी संवेदनशील डेटा उघड करण्यासाठी अधिकृत गुप्तता कायदा (ओएसए) च्या इतर तरतुदींचे उल्लंघन केले.

निशांत अग्रवाल खटल्यादरम्यान, यूपी-एटीएसचे तपास अधिकारी पंकज अवस्थी यांनी सांगितले की, सेजल नावाच्या व्यक्तीने अग्रवालला अडकवण्यासाठी पाकिस्तानमधून फेसबुक खाते तयार केले. ब्राह्मोस एरोस्पेस क्षेपणास्त्र अभियंता निशांत अग्रवाल आणि पाकिस्तानी गुप्तहेर ‘सेजल’ यांच्यातील चॅट्सवरून असे दिसून आले की ती भारतीय संरक्षण अधिकाऱ्यांना फसवण्यासाठी डेटा आणि टिप्स सामायिक करणाऱ्या टोळीचा भाग होती.अवस्थी यांच्या म्हणण्यानुसार, सेजलच्या सूचनांचे पालन केल्यानंतर आणि तिने पाठवलेल्या यूआरएलवर क्लिक केल्यानंतर अग्रवालने सन २०१७मध्ये त्यांच्या लॅपटॉपवर क्यूव्हिस्पर, चॅट टू हायर आणि एक्स ट्रस्ट हे तीन ॲप्स डाऊनलोड केले.

हे ही वाचा..

मुख्यमंत्री पिनाराई विजयन, मुलगी वीणा यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात उच्च न्यायालयाची नोटीस!

‘हमारे बारह’ चित्रपटात मुस्लिम समाजाविरुद्ध काहीही नाही!

उष्णतेमुळे ५७७ हज यात्रेकरूंचा मृत्यू; ५१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

पावो नूरमी स्पर्धेत नीरज चोप्राला सुवर्णपदक

हे तीन ॲप्लिकेशन मालवेअर होते. ज्यांनी निशांतच्या वैयक्तिक लॅपटॉपमध्ये प्रवेश केला आणि वर्गीकृत माहिती काढली. त्याच्या लॅपटॉपवर ब्रह्मोस क्षेपणास्त्राशी संबंधित महत्त्वाची माहिती आढळून आली आहे, जी सुरक्षा मानकांचे उल्लंघन करते. निशांतने लिंक्डइनवर सेजलशीही संवाद साधला. तिने यूकेमधील हेज एव्हिएशनमध्ये रिक्रूटर म्हणून त्याची भरती करण्यात स्वारस्य दाखवले होते.

ब्राह्मोस एरोस्पेसमध्ये वरिष्ठ यंत्रणा अभियंता म्हणून काम करणाऱ्या निशांत अग्रवालला उत्तर प्रदेशच्या एटीएसने हेरगिरीच्या आरोपाखाली ऑक्टोबर २०१८मध्ये अटक केली होती. नागपुरात झालेल्या खटल्यात तो गोपनीय माहिती शेअर केल्याप्रकरणी दोषी आढळला असून त्याला नुकतीच जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आधी नोंदवल्याप्रमाणे, ब्रह्मोस एरोस्पेसला सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्रे विकसित करण्याचे काम सोपवण्यात आले आहे, जे जगातील सर्वांत वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र मानले जाते. निशांत अग्रवाल जिथे कार्यरत होता, त्या नागपूर ब्राह्मोस युनिटमध्ये क्षेपणास्त्रांसाठी प्रणोदक बनवले जाते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा