भारत-पाक सीमेवर पाकिस्तानी घुसखोराला बीएसएफने टिपले!

सुरक्षा दलाकडून चौकशी सुरु

भारत-पाक सीमेवर पाकिस्तानी घुसखोराला बीएसएफने टिपले!

राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानच्या नापाक कारवायांना भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. बीएसएफने एका घुसखोराला ठार केले आहे. मंगळवारी (२४ डिसेंबर) रात्री १२.३० च्या सुमारास ही घटना घडली.

भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील केसरी सिंगपूर भागातील १X मध्ये एक पाकिस्तानी घुसखोर बेकायदेशीरपणे भारतीय हद्दीत प्रवेश करत होता. यावेळी सीमेवर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांची पाकिस्तानी घुसखोरावर नजर गेली. सुरक्षा जवानांनी पाकिस्तानी घुसखोराला थांबण्यास आणि पुन्हा माघारी फिरण्यास सांगितले. मात्र, घुसखोर भारतीय सीमेच्या दिशेने पुढे सरकत राहिला.

अशा स्थितीत सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबार करून पाकिस्तानी घुसखोराला ठार केले. ठार करण्यात आलेल्या पाकिस्तानी घुसखोराचे वय ३५ ते ४० वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या ताब्यातून १५०० रुपये पाकिस्तानी चलन, विडी-सिगारेट, तंबाखू-जर्दा आणि लायटरसह काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. सध्या सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती पाकिस्तानी सैनिकांना दिली आहे.

हे ही वाचा : 

इस्लाम स्वीकारण्याच्या दबावामुळे हिंदू मुलीने जीवन संपवले

अरविंद केजरीवाल यांची पुन्हा भविष्यवाणी

६७ प्रवाशांसह कझाकस्तानमध्ये लँडिंग करताना विमान कोसळले

१९९८ च्या ‘त्या’ घटनेमुळे अटलबिहारी वाजपेयीजींच्या नेतृत्वाचे दर्शन जगाला झाले!

या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे श्री गंगानगर जिल्ह्यात आजकाल दाट धुके दिसत आहे, त्यामुळे सीमा ओलांडून पाकिस्तानात बसलेल्या अवैध शस्त्रास्त्रे आणि ड्रग्जच्या तस्करीबरोबरच घुसखोरीला वाव आहे. त्यामुळेच हे दाट धुके आणि कडाक्याची थंडी असतानाही सीमा सुरक्षा दलाचे जवान सदैव सीमेवर करडी नजर ठेवून असतात. जेणेकरून पाकिस्तानच्या सीमेवर बसलेल्या शत्रूंचे नापाक इरादे हाणून पाडता येतील.

Exit mobile version