पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि इंग्रजी हे एक फार जुने हास्याचे समीकरण आहे. इंग्रजी येत नसतानाही ती भाषा बोलण्याचा अट्टाहास ही पाकिस्तानी क्रिकेटपटूंची जुनी खोड. पण त्यामुळे अनेकदा त्यांचे इंग्रजी हे जागतीक पातळीवरील थट्टेचा विषय बनलेले दिसते. पण तरिही ते त्यातून बोध घेताना दिसत नाहीत. अनेकदा सोशल मीडियावरही पाकिस्तानी क्रिकेटपटू हे चुकीच्या इंग्रजीमुळे ट्रोल झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.
पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी विकेट किपर कमरान अकमल हे त्यातीलच एक नाव. कमरान अकमल हा त्याच्या चुकीच्या इंग्रजीमुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होताना दिसत आहे आणि त्याला निमित्त ठरले आहे पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाचे. १४ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशाचे तुकडे करण्यात आले आणि पाकिस्तान नावाचा नवा देश जागतिक नकाशावर दिसू लागला. त्यामुळे १४ ऑगस्ट हा दिवस पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो.
हे ही वाचा:
महामार्गाच्या कामात शिवसेनेच्या गुंडगिरीचा अडसर
अखंड भारत संकल्पदिनाला मोदींनी केले ‘हे’ ट्विट
महाग पेट्रोलवर हा नवा पर्याय येणार
आज १४ ऑगस्टच्या निमित्ताने पाकिस्तानी क्रिकेटपटू कमरान अकमल याने ट्विटरवरून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. इंग्रजी मध्ये ‘Happy Independence Day’ असे लिहीत त्याने या शुभेच्छा देऊ केल्या. पण ते करताना त्याने एक घोळ घातला. तो ‘Independence’ या शब्दाचे स्पेलिंगच चुकला होता. ही एक बाब नेटकऱ्यांसाठी पुरेशी होती. या मुद्द्यावरून ट्विटरवरील भारतीय युजर्सनी तर पार त्याला सळो की पळो करून सोडले. पण एवढे होऊनही कमरान अकमलने अद्याप त्याचे हे ट्विट डिलीट केलेले नाही.
— Kamran Akmal (@KamiAkmal23) August 13, 2021