पाकिस्तान महिलांसाठी सुरक्षित नाही

पाकिस्तानात महिलांना अनेक समस्यांचा करावा लागतो सामना

पाकिस्तान महिलांसाठी सुरक्षित नाही

पाकिस्तानमधील लोकप्रिय अभिनेत्री आयशा उमर हिने पाकिस्तान महिलांसाठी सुरक्षित नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ती पाकिस्तान सोडून जाण्याचा विचार करत आहे, असेही तिने सांगितले. एका युट्युब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानमध्ये महिलांना कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, याचा पाढाच तिने वाचला.

‘या देशाची सर्वांत मोठी समस्या ही आहे की, मला इथे सुरक्षित वाटत नाही. मला येथे मोकळेपणाने रस्त्यावर फिरायचे आहे कारण असे फिरणे हा प्रत्येकाचाच अधिकार आहे. मला गाडीमध्ये बसायचे नाही. मला सायकल चालवायची इच्छा आहे. मात्र दुःखाची बाब ही आहे की, मी रस्त्यावर चालू शकत नाही. पाकिस्तानच्या उच्चभ्रू वस्तीमध्येही महिला अशा प्रकारे घराबाहेर पडू शकत नाही,’ असे या अभिनेत्रीने सांगितले.

हे ही वाचा:

ठाकरेंच्या मोर्चात बेगान्यांचीच गर्दी

अभिनेता अल्लू अर्जुनने दारू, पान मसाला ब्रँडची जाहिरात नाकारली

३० डिसेंबर रोजी श्रीराम विमानतळ अन् अयोध्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन

रा. स्व. संघाचे नेते श्रीनिवास यांच्या हत्येत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे सदस्य

‘मला नेहमीच मानसिक त्रास आणि चिंतेने ग्रासलेले असते. पाकिस्तानमध्ये महिला कोणत्या परिस्थितीतून जाते, हे पुरुष कधीच समजू शकत नाहीत. ज्यांच्या मुली आहेत, बहिणी, पत्नी आणि आई आहे, तेच समजू शकतील. मात्र हा त्रास महिलांशिवाय कोणीच समजू शकत नाही. येथील महिला प्रत्येक क्षणी घाबरून जीवन जगत असतात. कराचीमध्ये मला दोनवेळा लुटले गेले. अपहरण, बलात्कार आणि चोरांची भीती न बाळगता आरामात मी माझे जीवन कधी व्यतीत करू शकेन?,’ असा प्रश्नही आयेशाने उपस्थित केला.

 

आयेशाची आई ३० वर्षांची असताना विधवा झाली होती. तेव्हापासून तिची आई आणि भावाने तिला सांभाळले. या दरम्यान पाकिस्तानमध्ये त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. त्यानंतर तिचा भाऊ कायमचा डेन्मार्कला राहायला गेला. राजकीय नेत्यांनी पाकिस्तानची अवस्था बिकट करून टाकल्याने आता आयेशा आणि त्यांच्या आईलाही पाकिस्तान सोडायचे आहे.

Exit mobile version