25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषदहशतवादी हाफिज सईदच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान सरसावले!

दहशतवादी हाफिज सईदच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान सरसावले!

भारताला सुपूर्द करण्यास दिला नकार

Google News Follow

Related

भारताने मुंबईतील हल्ल्यांचा सूत्रधार दहशतवादी हाफिज सईद याचे प्रत्यार्पण करण्याची मागणी पाकिस्तानकडे केली आहे. भारताला हाफिज सईद याच्यावर खटले चालवायचे आहेत. पाकिस्तान मात्र दहशतवाद्यांची हरप्रकारे सुरक्षा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मुमताज जहरा बलोच यांनी ‘भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणताही प्रत्यार्पण करार अस्तित्वात नाही,’ असे स्पष्ट केले आहे.

‘पाकिस्तानला भारताकडून एक विनंती आली आहे. त्यात असे म्हटले आहे की, तथाकथित मनी लाँड्रिंग प्रकरणात हाफिज सईद यांना भारतात सोपवावे. मात्र हे लक्षात ठेवले पाहिजे की, भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्याही प्रकारे प्रत्यार्पणाचा करार अस्तित्वात नाही,’ असे बलोच यांनी स्पष्ट केले आहे. भारतात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने हाफिज सईद याला दहशतवादी घोषित केले आहे. सईदवर दहशतवाद्यांना निधी पुरवण्याच्या प्रकरणातही खटला सुरू आहे. मात्र पाकिस्तान हाफिज सईदसोबत उभा आहे.

हे ही वाचा:

नौदल अधिकाऱ्यांच्या वर्दीवर शिवमुद्रा; नवे स्कंधचिन्ह जाहीर!

‘इस्रायल-हमासचे युद्ध पंतप्रधान मोदीच थांबवू शकतात’

उत्तर मेक्सिकोमध्ये पार्टीत बंदुकधाऱ्यांच्या हल्ल्यात सहा ठार

मा शारदा मंदिर मुक्त करण्यासाठी भारताला साकडे!

भारताने सईदचा मुलगा तल्हा सईद हा पाकिस्तानमधून निवडणूक लढवत असल्याकडेही लक्ष वेधले. कट्टरपंथी दहशतवादी संघटना मुख्य प्रवाहात येणे, यात काही नवीन नाही. दीर्घकाळापासूनच पाकिस्तानच्या राजकारणाचा हा भाग राहिला आहे, अशी टीका भारताने केली आहे. ‘दहशतवाद्यांच्या प्रत्यार्पणासाठी काही कागदपत्रांसह इस्लामाबादला विनंती करण्यात आली आहे,’ अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अरविंद बागची यांनी दिली. ‘ज्याचा उल्लेख होतो आहे, तो अनेक प्रकरणांत भारताला हवा आहे. त्याला संयुक्त राष्ट्रानेही दहशतवादी घोषित केले आहे. या प्रकरणी आवश्यक अशा कागदपत्रांसह पाकिस्तान सरकारकडे त्याला भारतात प्रत्यार्पण करावे, अशी विनंती आम्ही केली आहे. जेणेकरून भारतात त्याच्याविरुद्ध खटला चालवता येईल,’ असे बागची यांनी स्पष्ट केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा