पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करत आहे.देशाची वाईट स्थिती पाहता राष्ट्रपतींकडून एक निर्णय घेण्यात आला आहे.पाकिस्तानचे नवनिर्वाचित राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी वेतन घेणार नसल्याचे जाहीर केले आहे.राष्ट्रपतींसह गृहमंत्री देखील बिनपगारी काम करणार आहेत.मात्र, राष्ट्रपती आसिफ अली झरदारी हे पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत नेत्यांपैकी एक आहेत.
पाकिस्तान सध्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानमध्ये सध्या नवे सरकार स्थापन झाले आहे. यासह आसिफ अली झरदारी देशाचे १४ वे राष्ट्रपती बनले आहेत.देशाची सद्याची परिस्थिती पाहता नवनिर्वाचित राष्ट्रपतींनी मंगळवारी ही घोषणा केली.आपल्या कार्यकाळात कोणताही पगार घेणार नसल्याचे सांगितले.राष्ट्रपतींच्या निर्णयानंतर गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी देखील तोच निर्णय घेतला.
हे ही वाचा:
संसद घुसखोर प्रकरण; भाजपचे खासदार प्रताप सिम्हा तिकिटाच्या प्रतीक्षेत!
रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएकडून एक संशयित ताब्यात
शाहजहान शेखचा शाळा सोडल्याचा दाखला बांगलादेशचा!
इंटरनेटवर ‘व्हॉट्स राँग विथ इंडिया?’ ट्रेंड!
मात्र, राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी वेतन न घेतल्याने पाकिस्तानला आर्थिक संकटातून वाचवता येणार नाही.कारण महागाईचा मोठा सामान या देशाला करावा लागत आहे.त्यामुळे पाकिस्तानवर असलेला कर्जाचा बोजा अधिक वाढत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे विदेशी कर्ज गेल्यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत १.२ अब्ज डॉलरने वाढून ८६.३५ अब्ज होते.ज्यामध्ये जागतिक बँक आणि चीनचा सर्वाधिक वाटा होता.
विशेष म्हणजे आसिफ अली झरदारी यांनी वेतन न घेतल्यामुळे त्यांना स्वतःला काहीच फरक पडणार नाही.कारण पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत नेत्यांपैकी झरदारी हे एक आहेत.आसिफ अली झरदारी यांच्या या निर्णयाबाबत राष्ट्रपतींच्या सचिवालय प्रेस विंगमधून एक प्रसिद्धी जारी करून माहिती देण्यात आली आहे. झरदारी हे पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत नेत्यांपैकी एक आहेत. त्यांची एकूण संपत्ती सुमारे १.८ अब्ज डॉलर्स आहे. त्यामुळे बिनपगाराचा राष्ट्रपतींचा हा निर्णय म्हणजे एक स्टंटबाजीच म्हणावी लागेल.