26 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरविशेषगटबाजीमुळे पाकिस्तान विश्वचषक स्पर्धेतून बाहेर?

गटबाजीमुळे पाकिस्तान विश्वचषक स्पर्धेतून बाहेर?

क्रिकेट संघात तीन गट

Google News Follow

Related

पाकिस्तानचा संघ टी २० विश्वचषक स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. यामागची वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. कर्णधार बाबर आझम आणि त्याच्या संघावर वेगवेगळे आरोप केले जात आहेत. त्यात भर पडली आहे ती गटबाजीची. पाकिस्तान संघाच्या वाईट कामगिरीसाठी वरिष्ठ खेळाडूंच्या खराब कामगिरीला जबाबदार धरले जात आहे.

पाकिस्तानच्या वाईट कामगिरीमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डातही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी भारतात भारतात झालेल्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने वाईट कामगिरी केल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मोठे बदल झाले होते. तेव्हा बोर्डाचा अध्यक्ष आणि कर्णधार दोन्ही बदलले होते. तर, जानेवारीमध्ये बोर्डाचे अध्यक्ष म्हणून मोहसिन नकवी यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी बाबरला पुन्हा कर्णधार केले. कर्णधार म्हणून पुनरागमन केल्यानंतर बाबर आझमसमोर सर्वांत मोठे आव्हान होते, ते संघाला एकजूट करण्याचे. मात्र गटबाजीमुळे तो असे करण्यास असमर्थ ठरला.

कर्णधारपद गमावल्यामुळे आणि बाबरने गरज असताना पाठिंबा न दिल्याने शाहीन शाह आफ्रिदी नाराज आहे. तर, कर्णधारपदासाठी आपला विचार न केल्याने मोहम्मद रिझवान नाराज आहे. ‘संघात तीन गट आहेत. एकाचे नेतृत्व कर्णधार बाबर आझम करतो. तर, दुसऱ्याचे नेतृत्व आफ्रिदी तर, तिसऱ्याचे रिझवान करतो. या सर्वांत मोहम्मद आमिर आणि इमाद वसीम सारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या पुनरागमनामुळे संघाची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘इमाद आणि आमिर पुन्हा संघात आल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. कारण या दोघांकडून बाबरला कोणतेही सहकार्य मिळणे अवघड झाले होते. या दोघांनी फ्रेंचाइजी आधारित लीगना सोडून दीर्घ काळ उच्चस्तरीय देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेले नाहीत. तर, काही खेळाडू एकमेकांशी बोलतही नव्हते.

हे ही वाचा:

स्मृती मंधानाच्या शतकी खेळापुढे दक्षिण आफ्रिका निष्प्रभ

काश्मीरप्रमाणे जम्मूमध्येही ‘शून्य दहशतवाद धोरण’

ईव्हीएम मशीन मोबाईलद्वारे हॅक होऊ शकते का?

वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या!

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अध्यक्ष मोहसीन नकवी यांना संघाच्या या अडचणींची आधीपासूनच कल्पना होती. त्यांचा निकटवर्तीय आणि राष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष वहाब रियाज याने याची कल्पना त्यांना दिली होती. नकवी यांनीही सर्व खेळाडूंशी स्वतंत्रपणे दोन बैठका घेतल्या आणि वैयक्तिक हिताऐवजी विश्वचषक जिंकण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते. त्यांनी विश्वचषक स्पर्धेनंतर सर्व गैरसमज दूर करण्याचे वचनही दिले होते. मात्र ते यशस्वी ठरले नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
218,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा