आर्थिक मंदीने ग्रस्त असलेल्या पाकिस्तानने पुन्हा कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे. भारत-पाकदरम्यानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर जम्मू जिल्ह्यातील अरनिया भागातील विक्रम चौकीवर मंगळवारी रात्री पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले. दोघांना जम्मू मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मंगळवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली. या वेळी पाकिस्तानच्या लष्कराकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन जवान जखमी झाले. एका जवानाच्या पोटात तर, दुसऱ्या जवानाच्या हाताला जखम झाली. दोन्ही जखमी जवानांना तत्काळ जम्मू मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. विक्रम चौकीवर सीमा सुरक्षा दलाचे १२० बटालियन तैनात आहेत. गोळाबाराची घटना घडताच सीमा सुरक्षा दल तसेच पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोणालाच सीमेच्या दिशेने जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
हे ही वाचा:
केरळमध्ये होते इस्रायलमधील पोलिसांच्या गणवेशांची निर्मिती
बायडेन यांच्या पाठोपाठ ऋषी सुनकही करणार इस्रायल दौरा?
गाझा पट्टीतील रुग्णालयावरील हल्ला कोणी केला?
ठरले; भारत २०३५ पर्यंत अंतराळ स्थानक उभारणार, २०४० पर्यंत चंद्रावर मानव पाठवणार
सीमेपलीकडून दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणे सोपे व्हावे, यासाठी पाकिस्तानच्या लष्करांनी दहशतवाद्यांना ‘कव्हर फायरिंग’ केल्याचे सांगितले जाते. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात पश्चिम बंगालचा आलोक साहा व सुरजित विश्वास हे दोन सीमा सुरक्षा दलाचे जवान जखमी झाले आहेत. मात्र याबाबत अधिक माहिती सीमा सुरक्षा दलाकडून मिळालेली नाही.