पाकिस्तान दुश्मनच, पण देशातील त्यांचे एजंट त्याहूनही धोकादायक!

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे विधान

पाकिस्तान दुश्मनच, पण देशातील त्यांचे एजंट त्याहूनही धोकादायक!

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्लेखोरांना ठार करण्यासाठी सुरक्षा दलांकडून शोधमोहीम सुरु आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे समोर येत आहे. तसेच हल्लेखोर हल्ला करून पाकिस्तानात परत गेल्याची माहिती आहे. भारताच्या सुरक्षा एजन्सीकडून त्यानुसार तपास सुरु आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्यात स्थानिकांची साथ असल्याचेही बोलले जात आहे. याच दरम्यान, हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. पाकिस्तान तर दुश्मन आहेच पण देशात राहून त्यांचे एजंट म्हणून काम करणारे त्याहूनही  धोकादायक असल्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री सरमा म्हणाले, पाकिस्तान तर दुश्मन आहेच. पण पाकिस्तानचा ठेका घेऊन भारतात आम्हाला विभाजन करण्याचे काम जे दलाल करत आहेत ते त्याहूनही धोकादायक आहेत. पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या मित्रांना आता आमची क्षमता दाखवण्याची वेळ आली आहे. देशवासी यांना नक्कीच धडा शिकवतील याचा मला विश्वास आहे, असे मुख्यमंत्री सरमा म्हणाले.

हे ही वाचा : 

“सरकारच्या हिंदुत्ववादी धोरणांमुळे झाला हल्ला” रॉबर्ट वाड्रा यांच्याकडून वादग्रस्त विधान

हिंदूंच्या अंगावर याल तर सगळे हिंदू तुमच्या अंगावर येवू, शक्ती कळायलाच हवी!

करारा जवाब मिलेगा !

“कलमा म्हणू शकलो म्हणून वाचलो…” हिंदू प्राध्यापकाने सांगितली घटना

दरम्यान, लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या प्रतिबंधित दहशतवादी गटाची शाखा असलेल्या ‘द रेझिस्टन्स फ्रंटने’ या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार म्हणून सैफुल्लाह कसुरी याचे नाव पुढे येत आहे. या हल्ल्यातील चार दहशतवाद्यांचे फोटो आणि स्केच समोर आले आहेत. आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी त्यांची नावे आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत आहे.

शेवटी त्यांनी शेण खाल्लेच ! | Mahesh Vichare | Sanjay Raut | Sushma Andhare | Pahalgam | Kashmir |

Exit mobile version