23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषनऊ महिन्यांच्या मुलीच्या पोटात आढळले बाळ !

नऊ महिन्यांच्या मुलीच्या पोटात आढळले बाळ !

आधी वाटले ट्युमरची गाठ, मात्र पोटातून निघाले दोन किलोचे बाळ

Google News Follow

Related

अल्पवयीन मुली गर्भवती राहिल्याच्या अनेक घटना घडत असतात.मात्र, नऊ महिन्याच्या चिमुकलीच्या पोटात दोन किलो वजनाचे बाळ आढळून आल्याची अजब घटना घडली आहे.डॉक्टरांनी त्या मुलीवर शस्त्रक्रिया करुन तिच्या पोटातील बाळ बाहेर काढले असून मुलीची प्रकृती ठीक असल्याची माहिती मिळाली आहे.

ही धक्कादायक घटना पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील सादिकाबाद शहरात घडली आहे. सादिकाबाद शहरातील शेख जायेद मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयामध्ये नऊ महिन्यांच्या मुलीला पोटदुखीवरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.डॉक्टरांना प्रथमतः तिच्या पोटात ट्युमर असल्याचं. त्यानंतर डॉक्टरांनी चिमुकलीवर शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं.मात्र, शस्त्रक्रियेदरम्यान चिमुकलीच्या पोटात चक्क दुसरं बाळ आढळून आल्याने पालकांसह डॉक्टरांनाही धक्का बसला.डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन हे दुसरं बाळ चिमुकलीच्या पोटातून बाहेर काढलं असून चिमुकलीची प्रकृती ठीक असल्याची माहिती आहे.

रुग्णालयातील डॉ. मुश्ताक अहमद यांनी सांगितलं की, ही चिमुकली एक महिन्यांची असल्यापासूनच तिला पोटदुखीची समस्या होती. त्यानंतर पोटदुखी वाढल्यावर तिला रुग्णालयात भरती करण्यात आलं.डॉ. मुश्ताक अहमद यांनी पुढे म्हणाले, प्रथमतः चाचणी दरम्यान चिमुकलीच्या पोटात पाण्याची पिशवी आणि ट्युमर यासारख काही असल्याचं आढळून आले.अल्ट्रासाउंड रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली होती.त्यानंतर डॉक्टरांनी चिमुकलीच्या पालकांना सांगितलं की, चिमुकलीवर त्वरीत शस्त्रक्रिया करुन ट्युमर हटवणं गरजेचं आहे. मात्र, चिमुकलीचे वय अवघे नऊ महिने असून या शस्त्रक्रियेदरम्यान मुलीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून तिच्या पालकांनी शस्त्रक्रियेला नकार दिला.पण, नंतर ते यासाठी तयार झाल्याचे डॉ. मुश्ताक अहमद यांनी सांगितले.त्यानंतर डॉक्टरांनी चिमुकलीवर शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातील भ्रूणाला बाहेर काढले.

हे ही वाचा:

विश्वचषक २०२३ साठी धवन, तिलकला डच्चू; सूर्यकुमार, श्रेयसला संधी

आदित्य एल १ पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत स्थिरावले

प्रेसिडेन्ट ऑफ इंडिया नव्हे प्रेसिडेन्ट ऑफ भारत

ट्रेनी एअर होस्टेसची हत्या केल्यानंतर आरोपीने कपडे बदलले! सीसीटीव्हीत झाले उघड

डॉ. अहमद यांनी पुढे सांगितले,हे भ्रूण सहा ते सात महिन्यांचं होत.या भ्रूणाचा चेहरा वगळता संपूर्ण शरीर मानवी बाळासारखं होतं. याचं कारण म्हणजे मानवी भ्रूणाचा विकास होताना चेहरा सर्वात शेवटी विकसित होतो.या चिमुकलीच्या पोटात सापडलेल्या भ्रूणाचे लहान आतडंही चिमुकलीशी जोडलेलं होतं. हे भ्रूण आतड्यांमधून चिमुकलीचं रक्त शोषत होतं. त्यामुळे ऑपरेशनमुळे चिमुकलीच्या जीवालाही धोका होता. मुलीचे वजन साडेआठ किलो होते, तर गर्भातून काढलेल्या भ्रूणाचं वजन दोन किलो असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं.

चिमुकलीचे वडील आसिफ हे शेती आणि गुरे पाळून उदरनिर्वाह करतात. ते म्हणाले, माझ्या मुलीला हा त्रास एक महिन्याचा असताना सुरू झाला. सुरुवातीला आम्हाला काय समस्या आहे हे माहित नव्हतं. आम्ही तीन-चार डॉक्टरांकडे गेलो पण, आजाराची माहिती मिळू शकली नाही. शेवटी आम्ही डॉक्टर मुश्ताक यांच्यापर्यंत पोहोचलो.त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करुन तिच्या पोटातील बाळ बाहेर काढले असून मुलीची प्रकृती आता ठीक असल्याचे त्यांनी सांगितले.
अशा प्रकारच्या घटनेला वैज्ञानिक भाषेत याला ‘फीटस इन फिटू’ (Fetus in Fetu) असं म्हटलं जातं.

या संदर्भात डॉ. मुश्ताक अहमद यांनी सांगितलं की, या समस्येला ‘फिटू इन फिटू’ म्हणून ओळखलं जातं. यामध्ये आईच्या पोटात दोन भ्रूण तयार होत असतात, पण एक मूल दुसऱ्या मुलाच्या शरीरात तयार होऊ लागतं. हे अतिशय दुर्मिळ प्रकरण आहे. अशी घटना १० लाखांपैकी एका वेळी घडते. या प्रकरणी चिमुकलीचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, या प्रकरणाबाबत अधिक माहिती घेतली जाईल, असं डॉक्टरांनी सांगितलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा