‘पाकिस्तान की औकाद नहीं कि भारत के चुनाव में दखल दे सके’

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पाकिस्तानसह राहुल गांधींवर टीका

‘पाकिस्तान की औकाद नहीं कि भारत के चुनाव में दखल दे सके’

काँग्रेसचा पाकिस्तानशी संबंध असल्याचा आरोप करत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संताप व्यक्त केला आहे.पाकिस्तानच्या माजी मंत्र्याने नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दर्शविला होता.पाकिस्तानी मंत्र्यांच्या या पाठिंब्यावर संरक्षण मंत्री सिंह यांना प्रश्न विचारण्यात आला की, पाकिस्तान भारताच्या निवडणुकीवर प्रभाव टाकत आहे का?, यावर उत्तर देताना मंत्री सिंह म्हणाले की, ‘पाकिस्तान की इतनी औकाद नाही की वह भारत के चुनाव मे दखल दे सके’.तसेच काँग्रेस पक्ष ‘आगीशी खेळत’ आहे, असा आरोपही मंत्री सिंह यांनी केला.पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बोलत होते.

मंत्री सिंह म्हणाले की, पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी राहुल गांधी यांची केलेली स्तुती ही अत्यंत चिंतेची बाब आहे, ज्या देशाने भारताला नेहमी अस्थिर करण्याचा प्रयत्न केला यावर काँग्रेसने स्पष्टीकरण दिले पाहिजे.ते पुढे म्हणाले की, भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशाबद्दलच्या या अपार प्रेमामागे काहीतरी कारण असावे.ही अत्यंत चिंतेची बाब असून भारताला या प्रेमामागील कारण जाणून घ्यायचे आहे.

हे ही वाचा:

“यंदाच्या निवडणुकीत उबाठाच्या मशालीची चिलीम होणार”

“वडेट्टीवारांचा जावईशोध, हेमंत करकरेंना लागलेली गोळी दहशतवादी कसाबच्या बंदुकीची नाही”

डोपिंग चाचणीत येण्यास नकार दिल्यानंतर बजरंग पुनिया निलंबित, पॅरिस ऑलिम्पिकचे स्वप्न होणार भंग?

ब्राझीलमध्ये मुसळधार पावसाचा हाहाःकार; ५७ हून अधिक जणांचा मृत्यू

१ मे रोजी पाकिस्तानी नेते आणि इम्रान खानचे निकटवर्ती फवाद चौधरी यांनी ‘एक्स’ वर काँग्रेस नेते राहुल गांधींचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता.त्यावर त्यांनी लिहिले होते की, राहुल इज ऑन फायर. यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली होती.यावर मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील संताप व्यक्त करत पाकिस्तान सोबतच्या संबंधांबाबत काँग्रेसने स्पष्टीकरण देण्याची मागणी त्यांनी केली आहे.तसेच भारताच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याची पाकिस्तानची क्षमता नसल्याचे मंत्री सिंह म्हणाले.

Exit mobile version