पाकिस्तानमध्ये हाय अलर्ट, ‘भारताचा लष्करी हल्ला अपरिहार्य’

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ यांचा दावा

पाकिस्तानमध्ये हाय अलर्ट, ‘भारताचा लष्करी हल्ला अपरिहार्य’

गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर, ज्यात २६ लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताचा लष्करी हल्ला होणारच, असा दावा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी सोमवारी केला.

या हल्ल्यानंतर भारतात तीव्र संताप उसळला असून, इस्लामाबादविरुद्ध तातडीने आणि कठोर प्रतिकार करण्याची मागणी जोर धरत आहे. भारताचा आरोप आहे की पाकिस्तान आपल्या भूमीवर दहशतवाद्यांना आश्रय देतो.

आसिफ यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, “आम्ही आमचे सैन्य अधिक बळकट केले आहे कारण भारताचा हल्ला आता अपरिहार्य वाटतो. त्यामुळे काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. आसिफ यांनी पुढे सांगितले की, पाकिस्तानी लष्कराने सरकारला भारतीय हल्ल्याच्या शक्यतेबाबत माहिती दिली आहे, जरी त्यांनी कोणत्या गुप्तचर माहितीच्या आधारे हा अंदाज वर्तवला आहे ते स्पष्ट केले नाही. त्यांनी इशारा दिला की, “जर आमच्या अस्तित्वाला थेट धोका निर्माण झाला, तरच पाकिस्तान अण्वस्त्रांचा वापर करेल.”

पहलगाम हल्ल्याची पार्श्वभूमी

२२ एप्रिल रोजी TRF (The Resistance Front) या लष्कर-ए-तोयबाच्या (LeT) उपशाखेशी संबंधित ५-६ दहशतवाद्यांनी २६ लोकांची हत्या केली, यामध्ये बऱ्याच प्रमाणात पर्यटकांचा समावेश होता. या नरसंहारात धर्मावर आधारित निवड करून बळी मारण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे. ही घटना गेल्या अनेक वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये घडलेला सर्वात भीषण नागरी हल्ला मानली जात आहे.

हे ही वाचा:

नव्या ‘स्वच्छ भारत’ अभियानासाठी काही टाळकी वठणीवर आणणे गरजेचे…

पाकिस्तानसमोर मोठा प्रश्न : नवाज यांनी पीएम शहबाजना काय सल्ला दिला?

नौसेनेला किती मिळणार राफेल-एम फायटर जेट

पुन्हा प्रदर्शित होणार ‘बाहुबली’

हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारताने खालील कठोर उपाययोजना केल्या:

याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने:

पंतप्रधान मोदींचा निर्धार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले, “ज्यांनी हा कट रचला आणि ज्यांनी दहशतवाद्यांना लपवले, त्यांना अशी शिक्षा दिली जाईल जी त्यांनी स्वप्नातही पाहिली नसेल. आता उरलेल्या दहशतवादी तळांचा नाश करण्याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांचे संकल्प त्यांच्या मास्टरमाइंड्सना चिरडून टाकतील.”

Exit mobile version