भारतात रंगलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाने दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेला सहा विकेटने पराभूत करून ऐतिहासिक विक्रम केला आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानला सर्वाधिक वेळा पराभूत केल्याचा विक्रमही मागे पडला आहे. आता पाकिस्तानचा संघ विश्वचषक स्पर्धेत कोणत्याही संघाविरोधात सर्वाधिक वेळा सामना जिंकणारा संघ ठरला आहे.
या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने विश्वचषक सामन्यातील सर्वांत मोठे लक्ष्य गाठले आहे. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा दुसरा सामना मंगळवारी श्रीलंकेविरोधात झाला. यात पाकिस्तानने चार विकेट गमावून ३४५ धावांचे लक्ष्य गाठले.
पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान आणि अब्दुल्ला शफिकने शानदार शतक ठोकून ४८.१ षटकांतच हा सामना खिशात टाकला. विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंतच्या इतिहासात पाठलाग करून लक्ष्य गाठण्यात आलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी पाकिस्तानने विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंड एकदिवसीय सामन्यात २६४ धावांचे लक्ष्य गाठले होते. हा सामना १९९२ मध्ये झाला होता. त्यावेळी पाकिस्तान विश्वविजेता ठरला होता.
एकाच सामन्यात पाकिस्तानच्या दोन फलंदाजांनी शतके ठोकण्याची विश्वचषक सामन्यातील ही पहिलीच वेळ होती. तसेच, विश्वचषक स्पर्धेतील एकाच सामन्यात चार शतके ठोकण्यात आल्याचेही हे पहिलेच उदाहरण ठरले. एकूण एकदिवसीय सामन्यात हे आतापर्यंत तिसऱ्यांदा घडले आहे. या व्यतिरिक्तही सामन्यात अन्य विक्रमही झाले. मोहम्मद रिझवानने १३१ धावा केल्या. त्यामुळे आतापर्यंतच्या एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात तो सर्वाधिक धावा करणारा पाकिस्तानचा विकेटकीपर ठरला आहे.
विश्वचषक स्पर्धेत एखाद्या संघाविरोधात सलग विजयाचा विक्रम
- पाकिस्तान विजयी विरुद्ध श्रीलंका – आठवेळा
- भारत विजयी विरुद्ध पाकिस्तान- सातवेळा
- वेस्ट इंडिज विजयी विरुद्ध झिम्बाब्वे- सहावेळा
हे ही वाचा:
पाच हजार घरे जमीनदोस्त; पॅलिस्टिनींची उपासमार
दादा भुसेंचा सुषमा अंधारेंना इशारा!
लेक लाडकी; महाराष्ट्रातल्या ‘नवदुर्गां’ना नवरात्रौत्सवाची भेट
ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्याचा संकल्प करूया
विश्वचषक स्पर्धेत सर्वांत मोठे लक्ष्य गाठण्याचा विक्रम
- पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, २०२३ – ३४५
- आयर्लंड विरुद्ध इंग्लंड, २०११- ३२८
- बांग्लादेश विरुद्ध वेस्टइंडिज, २०१९- ३२२
- बांग्लादेश विरुद्ध स्कॉटलंड, २०१५- ३१९
- श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे, १९९२- ३१३