पाकिस्तान सरकारने रविवारी, देशाच्या वरिष्ठ पुरुष क्रिक्रेट संघाला २०२३च्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतात जाण्यासाठी अखेर मंजुरी दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा क्रिकेट संघ भारतात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यात सहभागी होणार की नाही, याबाबत असणारी अनेक महिन्यांची अनिश्चितता अखेर संपुष्टात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वार हे जाहीर केले. मात्र त्यांनी पाकिस्तानी क्रिकेटच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली असून त्याबाबत ते आयसीसी आणि भारतीय अधिकाऱ्यांना कळवणार आहेत.
‘खेळ आणि राजकारण या दोन विभिन्य गोष्टी आहेत. त्यांची एकमेकांशी गल्लत करू नये, असे पाकिस्तानने सातत्याने सांगितले आहे. त्यामुळे आगामी विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी आम्ही आपला संघ भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
ऑस्कर विजेता माहितीपट ‘द एलिफंट व्हिस्पर्स’मधील कलाकारांचे पैसे बुडवले?
ठाकरेंच्या ‘मातोश्री’ बंगल्यात आढळला विषारी कोब्रा!
‘आम्ही आमच्या दाव्याच्या समीप’
राममंदिरासाठी बनवले विक्रमी ४०० किलो वजनाचे कुलूप
‘पाकिस्तानचा असा विश्वास आहे की, भारतासोबतच्या द्विपक्षीय संबंधांची स्थिती त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा-संबंधित जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात अडथळे आणणार नाही,’ असेही यात स्पष्ट केले आहे. मात्र त्यांनी त्यांच्या संघाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्याबाबत ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि भारतीय अधिकाऱ्यांना कळवणार आहेत. ‘आम्ही अपेक्षा करतो की, भारत दौऱ्यात पाकिस्तान क्रिकेट संघाच्या संपूर्ण सुरक्षेबाबत योग्य ती काळजी घेतली जाईल,’ असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
सन २०१६च्या टी-२० विश्वचषकादरम्यान पाकिस्तानचा संघ भारतात अखेरचा सामना खेळला होता. परंतु दोन्ही देश सन २०१२-१३पासून भारतात द्विपक्षीय मालिकेत खेळलेले नाहीत.