पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पत्नीला दिलासा, २६५ दिवसांनंतर तुरुंगातून सुटका!

१० लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पत्नीला दिलासा, २६५ दिवसांनंतर तुरुंगातून सुटका!

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांची २६५ दिवसांनंतर रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगातून सुटका झाली आहे. बुशरा बीबी यांना तोशाखाना प्रकरणात बुधवारी (२३ ऑक्टोबर) इस्लामाबाद उच्च न्यायालयातून जामीन मिळाला.

बुशरा बीबी यांना तब्बल ९ महिन्यांनंतर जामीन मिळाला आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांना १० लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. तोशाखाना प्रकरणात बुशरा बीबी यांना ३१ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. सरकारी नियमांचे उल्लंघन करून भेटवस्तू बाळगणे आणि विकल्या प्रकरणी दोषी आढळल्यानंतर न्यायालयाने त्यांना १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.

न्यायाधीश मियांगुल हसन औरंगजेब यांनी माजी फर्स्ट लेडीचा जामीन अर्ज स्वीकारला आणि १० लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. कोर्टाकडून जामीन अर्ज मंजूर झाल्यानंतर बुशरा बीबी यांची आज तुरुंगातून सुटका झाली.  दरम्यान, माजी पंतप्रधान इम्रान खान गेल्या एक वर्षापासून रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात बंद आहेत. पाकिस्तान सरकारने त्यांच्यावर तोशाखाना घोटाळ्यासह अनेक आरोप केले आहेत.

काय आहे तोषखाना प्रकरण?

तोशाखाना हा एक विभाग आहे जिथे पंतप्रधान किंवा पाकिस्तान सरकारकडून मिळालेल्या भेटवस्तू ठेवल्या जातात. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर २०१८ ते २०२२ या काळात १४ कोटी रुपयांच्या भेटवस्तू स्वस्तात खरेदी केल्याचा आणि त्या स्वत:जवळ ठेवल्याचा आरोप आहे. यामध्ये महागडी घड्याळ, अंगठी, महागडे पेन अशा अनेक अनमोल भेटवस्तूंचा समावेश होता.

हे ही वाचा : 

अतुल भातखळकर ‘विजयी भव’…

देशात ठिकठीकाणी लव्ह जिहादची चार प्रकरणे

जस्टिन ट्रुडो राजीनामा द्या! स्वपक्षातील खासदारांनीच केली मागणी

प्रियांका गांधी यांची डोळे दिपवणारी संपत्ती, बहुधा लग्नात आहेर म्हणून आईने दिली असावी!

Exit mobile version