मोहम्मद शमीच्या ट्रोलिंगमागे पाकिस्तानचा कट

भारताच्या विजयामुळे पाकिस्तानला आला संताप

मोहम्मद शमीच्या ट्रोलिंगमागे पाकिस्तानचा कट

विश्वचषक २०२३मध्ये भारताने अंतिम फेरीत दिमाखदारपणे प्रवेश केला आहे. बुधवारी मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला. या सामन्यात गोलंदाज मोहम्मद शमीने सात विकेट घेऊन भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. मात्र भारताच्या या सातत्यपूर्ण विजयामुळे संतापलेल्या पाकिस्तानकडून आता सातत्याने शमी आणि संघाचे मनोधैर्य कमी करण्यासाठी ट्रोलिंगचा आधार घेतला जात आहे.

 

न्यूज १८ने दिलेल्या वृत्तानुसार, एका खासगी सूत्राने सांगितले की, सोशल मीडियावर सातत्याने खेळामधील जातीय भेदभाव करण्याचा खोडसाळ प्रयत्न केला जात आहे. यामागे पाकिस्तानच्या सायबर युनिटच्या प्रोत्साहनामुळे चालवले जाणारे समूह आणि पाकिस्तानचे काही प्रोफाइल्स आहेत. न्यूझीलंडच्या विरुद्ध सामन्यातही ट्रोलर्सने शमीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता.

हे ही वाचा:

गाझामधील अल शिफा रुग्णालयात हमासचे भुयार

वर्ल्डकप अंतिम सामन्याआधी हवाई दलाचा विशेष ‘एअर शो’

मुंबईतील हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांची वाहनांवर कारवाई

‘ऑपरेशन काली’ अंतर्गत पाच दहशतवाद्यांचा खात्मा

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याचा झेल सोडल्यावरही शमीला ट्रोल केले गेले होते. मात्र शमीने स्वतःच्या भेदक गोलंदाजीने कमाल केली. त्याने विल्यमसन आणि डेरिल मिचेल यांच्या १८१ धावांच्या मजबूत भागिदारीला खिंडार पाडले. सन २०२१मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात पराभवानंतरही शमी याला लक्ष्य करण्यात आले होते.

 

श्रीलंकेविरोधात भारताने शानदार विजय मिळवल्यानंतरही पाकिस्तान यूजर प्रोफाइलने शमीला लक्ष्य केले होते. त्यावेळी शमीला विकेट मिळाल्यानंतर ते आनंदाच्या भरात जमिनीवर बसले, तेव्हाही पाकिस्तानी प्रशंसकांनी त्याच्यावर टीका केली होती. पाकिस्तानची निराशा अनेक ठिकाणी दिसून येत आहे. क्रिकेट सामन्यादरम्यानही ती सातत्याने दिसून येत आहे. धर्माचा उल्लेख करून भारतीय खेळाडूंचे खच्चीकरण करून सौहार्द आणि खेळभावनेला बिघडवण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version