27 C
Mumbai
Wednesday, March 26, 2025
घरविशेषपाकिस्तानचा भारतावर आरोप, म्हणाले दहशतवादाला प्रोत्साहन देतो!

पाकिस्तानचा भारतावर आरोप, म्हणाले दहशतवादाला प्रोत्साहन देतो!

गेल्या आठवड्यातही केला होता आरोप 

Google News Follow

Related

बलुचिस्तानमधील बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तानचे शाहबाज सरकार घाबरले आहे. खोटा दावा करत, पाकिस्तानने गुरुवारी (२० मार्च) भारतावर देशात दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला आणि म्हटले कि बलुचिस्तानला अस्थिर करण्यात नवी दिल्लीचा सहभाग अगदी स्पष्ट आहे. परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते शफकत आली खान यांनी भारतावर आंतरराष्ट्रीय हत्या मोहीम राबवल्याचा आरोप केला.

शफकत आली खान पत्रकार परिषदेत म्हणाले, भारताचा सहभाग स्पष्ट आहे. तो पाकिस्तानमध्ये दहशतवादाला (प्रोत्साहन देण्यामध्ये ) सहभागी आहे आणि दुसरे म्हणजे केवळ पाकिस्तान नाहीतर सर्व दक्षिण आशियाई देशांना अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी आरोप केला की, पाकिस्तानात दहशतवादाला प्रोत्साहन देण्यात आणि बलुचिस्तानला अस्थिर करण्यात भारताचा सहभाग अगदी स्पष्ट आहे.

हे ही वाचा : 

दिल्लीतील न्यायाधीशांच्या बंगल्याला लागलेल्या आगीनंतर सापडली बेहिशेबी रोकड

वीजपुरवठा खंडित झाल्याने लंडनमधील हीथ्रो विमानतळ बंद

मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला एक कोटींची खंडणी घेताना अटक

हमासचा प्रचार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या बदर खानच्या हद्दपारीला स्थगिती

११ मार्च रोजी बलूच लिबरेशन आर्मीने जाफर एक्स्प्रेसवर केलेल्या हल्ल्यानंतर काही दिवसांनी ही टिप्पणी करण्यात आली. शफकत आली खान पुढे म्हणाले, भारताने जाफर एक्स्प्रेसवरील हल्ल्याचा कधीच निषेध केला नाही. दरम्यान, गेल्या आठवड्यात पाकिस्तानने असाच आरोप केला होता, ज्यावर नवी दिल्लीने प्रतिक्रिया दिली होती. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल १४ मार्च रोजी म्हणाले, जागतिक दहशतवादाचे केंद्र कोठे आहे हे संपूर्ण जगाला माहिती आहे. पाकिस्तानने आपल्या अंतर्गत समस्या आणि अपयाशांसाठी इतरांवर बोटे दाखवण्याऐवजी आणि दोष देण्याऐवजी स्वतःमध्ये पहावे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
238,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा