पाकच्या टीआरएफ दहशतवादी गटाने स्वीकारली जम्मू-काश्मीर बस हल्ल्याची जबाबदारी!

एनआयएकडून हल्ल्याची तपासणी सुरु

पाकच्या टीआरएफ दहशतवादी गटाने स्वीकारली जम्मू-काश्मीर बस हल्ल्याची जबाबदारी!

जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान-समर्थित ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या दहशतवादी गटाने स्वीकारली आहे.दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १० जण ठार झाले असून ३३ जण जखमी झाली आहेत.विशेष म्हणजे ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या दहशतवादी गटाने पुन्हा अशा प्रकारचे हल्ले होतील असा इशाऱ्याचा संदेश दिला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवण्यासाठी पाकिस्तानने ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ नावाची नवी दहशतवादी संघटना तयार केली आहे.यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये अनेक मोठे दहशतवादी हल्ले आणि गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत आणि याची जबाबदारी या संघटनेने स्वीकारली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या प्रमुख कमांडरचे या दहशतवादी संघटनेवर नियंत्रण असते.दरम्यान,रियासी जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ने स्वीकारली आहे.तसेच ‘पर्यटक आणि गैर स्थानिकांवर’ अशा आणखी हल्ल्यांचा इशारा दिला आणि रियासी हल्ल्याला “नूतनीकरणाची सुरुवात” म्हटले आहे.

हे ही वाचा:

रशियाच्या लढाऊ विमानाला युक्रेनने केले लक्ष्य!

टेस्लाच्या एआय यंत्रणेत भारतीय वंशाच्या इंजिनियरचे योगदान!

ओडिशातील भाजपचे पहिले सरकार १०जूनऐवजी १२ जून रोजी शपथ घेणार!

‘पुन्हा भाजपचा जयजयकार केल्यास जमिनीत गाडून टाकू’

दरम्यान, दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या भागात सुरक्षा मजबूत करण्यात आली असून या हल्ल्याच्या तपासाचे काम राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवण्यात आले आहे.दरम्यान, ही बस शिव खोरी मंदिरातून माता वैष्णोदेवी मंदिराच्या बेस कॅम्प असलेल्या कटरा येथे परतत असताना ही घटना घडली. जवळच्या जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांनी वाहनावर हल्ला केला आणि गोळीबार केला. बसच्या चालकाला गोळी लागल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली.

Exit mobile version