देशातील जगप्रसिद्ध चित्रकार सय्यद हैदर रझा यांच्या कोट्यवधी रुपये किमतीची पेंटिंग चोरीला गेली आहेत. १९९२ मध्ये काढण्यात आलेले हे पेंटिंग बॅलार्ड पिअर येथील गुरू ऑक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेडच्या गोदामातून चोरीला गेले आहे.
या पेंटिंगची अंदाजे किंमत अडीच कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीला गेलेली पेंटिंग जगप्रसिद्ध चित्रकार एस. एच. रझा यांनी १९९२ साली कॅनव्हासवर ॲक्रेलिकवर बनवलेले ‘नेचर’ नावाचे पेंटिंग होते. ‘नेचर’ पेंटिंगची किंमत अंदाजे अडीच कोटी रुपये आहे. हे पेंटिंग बॅलार्ड पिअर येथील गुरू ऑक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेडच्या गोदामात विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.
पोलीस अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात व्यक्तीने गोदामात घुसून हे पेंटिंग चोरले आहे.हे पेंटिंग बॅलार्ड पिअर येथील गुरू ऑक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेडच्या गोदामात विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. कोविडच्या काळात हे पेंटिंग गोदामात ठेवण्यात आले होते, दोन वर्षांनी रझा याच्या पेंटिंगचा शोध घेण्यासाठी गोदाम उघडले असता हे पेंटिंग आढळले नाही.
हे ही वाचा:
राहुल गांधींचा अजब दावा… भारतात शिखांना पगडी, कडे घालू द्यायचे की नाही, यावरून संघर्ष!
मणिपूर अशांत; निदर्शने सुरूच, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, पाच दिवस इंटरनेट बंद !
१६ वर्षांखालील मुलांना ऑस्ट्रेलियात ‘सोशल मीडियाबंदी’
उमर गौतमसह १४ जणांची धर्मांतरणाची टोळी दोषी !
रझा यांच्या निकटवर्तीयांनी या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता, या तक्रारर्जावरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनवटे यांनी दिली.
गोदामात तसेच परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले मात्र त्यात दोन ते महिन्याचे फुटेज असल्यामुळे चोरी करतानाचे फुटेज मिळून आलेले नसल्याची माहिती एका पोलिस अधिकारी यांनी दिली.
चित्रकार सय्यद हैदर रझा कोण आहेत?
चित्रकार एस एच रझा हे भारतातील अशा कला नायकांपैकी एक आहेत ज्यांनी भारतीय चित्रकलेची आधुनिकता व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ते बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप (PAG) च्या सह-संस्थापकांपैकी एक होते. त्यांनी नागपूर स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतले आणि सर जे.जे. बॉम्बे येथील स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतले. रझा पॅरिसला 1950 ते 1953 या काळात इकोले नॅशनल सुपरिएर डेस ब्यूक्स-आर्ट्समध्ये शिकण्यासाठी गेले. त्याने आपले बहुतेक आयुष्य पॅरिस आणि गोर्बेक्स, फ्रान्समध्ये घालवले. सय्यद हैदर रझा यांचे 23 जुलै 2016 रोजी नवी दिल्ली येथे निधन झाले.