न्यायालयाच्या आदेशानंतर संभल येथील जामा मशिदीच्या रंगकामाला सुरुवात

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण पथकाच्या देखरेखीखाली काम सुरू

न्यायालयाच्या आदेशानंतर संभल येथील जामा मशिदीच्या रंगकामाला सुरुवात

उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशिदीच्या रंगकामाला सुरुवात झाली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण पथकाच्या देखरेखीखाली हे रंगकाम केले जात आहे. एएसआयने नऊ रंगकर्मींना कामावर ठेवून रंगकामाचे काम सुरू केले आहे. जामा मशिदीची रचना पांढऱ्या रंगाने रंगवली जात आहे. अलाहबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रंगकामाचे काम सुरू आहे. तसेच हे रंगकाम पुढील चार दिवसांत पूर्ण होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने मशिदीच्या रचनेला रंगवण्याची जबाबदारी एएसआयकडे सोपवली आहे. शनिवारी, मशिदीला रंगविण्यासाठी एक टीम आली होती. रंगकाम प्रथम पांढऱ्या रंगाने केले जात आहे. मशीद समितीचे अध्यक्ष जफर अली अॅडव्होकेट आणि इतर समिती सदस्य देखील घटनास्थळी उपस्थित आहेत. सदर जफर अली यांनी आयएएनएसला सांगितले की, मशिदीला रंगवण्याचे काम सुरू झाले आहे. नऊ ते दहा कामगार पांढरे करण्याचे काम करतात. सोमवारपासून आणखी कामगार जोडले जातील. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, सध्या मशिदीच्या बाहेरील भिंतींवर रंगकाम केले जात आहे. मशिदीला रंग देणाऱ्या कामगारांपैकी एक असलेल्या रईसने आयएएनएसला सांगितले की, सर्वप्रथम मशिदीबाहेरील सर्व भिंती रंगवल्या जातील. त्या सर्वांना दिल्लीहून बोलावण्यात आले आहे. त्यांना सात दिवसांचा वेळ मिळाला आहे.

अलिकडेच अलाहाबाद उच्च न्यायालयाने संभलच्या शाही जामा मशिदीच्या समितीला मशिदीच्या बाहेरील भिंती रंगविण्यासाठी परवानगी दिली होती. न्यायालयाने मशीद समितीची बाजू अंशतः मान्य करताना, मशिदीच्या बाहेरील भिंतींवरच रंगकाम करता येईल असा आदेश दिला होता. उच्च न्यायालयाने असेही म्हटले होते की बाहेरील भिंतींवरही प्रकाशयोजना बसवता येते, परंतु हे काम कोणत्याही संरचनेला नुकसान न करता केले पाहिजे. मशीद समितीने अलाहाबाद उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती.

हे ही वाचा : 

भाजपकडून विधान परिषदेसाठी तीन उमेदवार

सोने तस्करी प्रकरण: रान्या रावचे सावत्र वडील सक्तीच्या रजेवर

हौथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करत ट्रम्प यांचा इशारा; हल्ला केला तर अवस्था नरकापेक्षाही वाईट होईल

लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अबू कतालची पाकिस्तानमध्ये गोळ्या झाडून हत्या

फेब्रुवारीमध्ये, उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसआयटीने २४ नोव्हेंबर रोजी संभल येथे झालेल्या हिंसाचाराशी संबंधित १२ पैकी सहा प्रकरणांमध्ये ४,००० पानांपेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र सादर केले आहे. ही हिंसाचाराची घटना एएसआयकडून करण्यात येत असलेल्या मुघलकालीन मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान घडली होती. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला. शिवाय अधिकारी आणि स्थानिकांसह अनेक जण जखमी झाले. आरोपपत्रानुसार, आतापर्यंत ८० जणांना अटक करण्यात आली आहे, तर ७९ जण अजूनही फरार आहेत, त्यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या १५९ झाली आहे. हिंसाचाराच्या ठिकाणी आणि इतर ठिकाणांहून जप्त केलेली शस्त्रे ब्रिटन, अमेरिका, जर्मनी आणि चेकोस्लोव्हाकिया सारख्या देशांमध्ये बनवली जात होती, असेही या दस्तऐवजात नमूद करण्यात आले आहे.

मुस्लिम लांगुलचालनाचा हा आणखी एक नमुना... | Amit Kale | Rahul Gandhi | Congress |

Exit mobile version