प्रसिद्ध चित्रकार देविदास पेशवे यांचे निधन

प्रसिद्ध चित्रकार देविदास पेशवे यांचे निधन

प्रसिद्ध चित्रकार देविदास पेशवे यांचे निधन झाले आहे. मंगळवार, १४ सप्टेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ६० व्या वर्षी देविदास पेशवे कालवश झाले. काही दिवसांपासून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण त्याला यश आले नाही. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मूळचे बारामतीचे असणारे देविदास पेशवे हे तिथल्याच अभिनव महाविद्यालयात प्राध्यापकी करत होते. त्याआधी त्यांनी अनेक वर्ष केसरी या दैनिकात काम करत होते. गेली अनेक वर्ष ते दैनिक साप्ताहिकांसाठी चित्र काढत होते. तर वृत्तपत्रांची सजावट करण्यासाठीही ते सुपरिचित होते. त्यांनी अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे आणि पुस्तकाच्या आत असणारी चित्रे साकारली आहेत.

हे ही वाचा:

‘या’ लोकसभा खासदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल

सहा जिल्ह्यांच्या पोटनिवडणुकांना मिळाला मुहूर्त; ५ ऑक्टोबरला मतदान

नामांकित लेखकांच्या पुस्तकांचे ते करत होते बेकायदेशीर ‘पीडीएफ’

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जमिनीवरच अनधिकृत बांधकामे

आपल्या शांत आणि आपलेसे करणार्‍या स्वभावामुळे अनेक व्यक्तींशी त्यांचे ऋणानुबंध होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक प्रकाशन संस्थांसोबत काम केले असून त्यांच्यासोबत कित्येक वर्षाचा ऋणानुबंध जपला होता.

चित्रांविषयी उत्तम प्रकारचा अभ्यास असणारे एक व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. यासोबतच भाषा, संस्कृती, पुराण या विषयांसाठी त्यांचा गाढा अभ्यास होता. पेशवे यांच्या निधनामुळे समाजातून शोक व्यक्त केला जात असून एक उत्तम दर्जाचा चित्रकार गमावल्याची भावना कला विश्वातून व्यक्त होत आहे.

Exit mobile version