जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट थांबण्याचे नाव घेत नाही. या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वत्र रोष व्यक्त केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शनिवार (२६ एप्रिल) रोजी अमृतसरमध्येही संताप व्यक्त करत बाजार बंद करण्यात आले. हिंदू संघटना, शिवसेना आणि अमृतसर मेडिकल असोसिएशन यांच्या आवाहनावरून शहरात पूर्णपणे बाजार बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली होती. याचा विशेष प्रभाव हॉल बाजार परिसरात दिसून आला, जिथे सर्व दुकाने आणि व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, पहलगाम घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. प्रत्येक नागरिक या हल्ल्याबाबत चिंता आणि दुःख व्यक्त करत आहे. लोकांचे म्हणणे आहे की, ही फक्त एका शहराची नव्हे, तर संपूर्ण देशाच्या भावना व्यक्त करणारी बाब आहे. अनेक राजकीय आणि सामाजिक संस्थांनी या घटनेच्या विरोधात निदर्शने केली. कुठे कॅंडल मार्च काढण्यात आले, तर कुठे मौनव्रत आणि धरणे आंदोलन करून आपला आक्रोश व्यक्त केला.
हेही वाचा..
“एकतर आमचे पाणी वाहेल किंवा त्यांचे रक्त…” पाक नेते बिलावल भुट्टो- झरदारी बरळले
भिक्षेकरी आणि बेघरांसाठी सामाजिक न्याय विभागाचे चिंतन
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट
पहलगाम हल्याबद्द्ल पाकिस्तानी पंतप्रधानाचे काय मत ?
यशकर सिंह यांनी बोलताना सांगितले की, पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या हल्ल्यानंतर अमृतसरमधील होलसेल मार्केटने सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. काल रात्री शिवसेनेच्या नेत्यांनीही या बंदला समर्थन जाहीर केले होते. आज दुकानं बंद आहेत आणि असे वाटते की हळूहळू संपूर्ण पंजाब या बंदच्या दिशेने जात आहे. २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरात तीव्र संताप निर्माण झाला असून अनेक ठिकाणी लोक सातत्याने निषेध आंदोलन करत आहेत. कॅंडल मार्च, धरणे, मौनव्रत यांसारख्या माध्यमातून विरोध दर्शवला जात आहे. अनेक राज्यांमध्ये व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून या हल्ल्याचा निषेध केला आहे.