जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. या हल्ल्यातील दहशतवाद्यांवर कारवाई केली जात आहे. या प्रकरणातील दोन स्थानिक दहशतवादी आदिल ठोकर आणि दहशतवादी आसिफ शेख यांच्यावर प्रशासनाने कारवाई केली आहे.
प्रशासनाने दहशतवाद्यांच्या घरावर कारवाई करण्यात आली आहे. दहशतवादी आसिफ ठोकरच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला आहे तर दहशतवादी आदिल शेखच्या घराच्या तपासणी दरम्यान अचानक स्फोट झाला आणि घर उध्वस्त झाले. याच दरम्यान, दहशतवादी आदिलच्या आईचे वक्तव्य समोर आले आहे.
इंडिया टीव्हीच्या बातमीनुसार, दहशतवादी आदिलची आई शहजादा म्हणाली, “काल रात्री उशिरा सैन्याने आमच्या घरावर छापा टाकला आणि नंतर रात्री एक स्फोट झाला आणि घर उद्ध्वस्त झाले. आदिलच्या आईने सांगितले की, पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेला हल्ला चुकीचा आहे. ते निर्दोष होते, असे घडू नये. या हल्ल्यात जो कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे.” या प्रकरणात दहशतवादी आदिल दोषी आढळला तर त्याला कोणती शिक्षा मिळावी असे विचारले असता, शहजादा म्हणाल्या, त्यालाही सर्वात कठोर शिक्षा झाली पाहिजे कारण ते निर्दोष लोक होते.
हे ही वाचा :
पाकिस्तानी नागरिकांना ओळखून परत पाठवून द्या!
पहलगाम हल्ला बंदुकधाऱ्यांनी केला, न्यूयॉर्क टाइम्सच्या हेडलाइनवरून अमेरिकेचा संताप
कॉमेडियन कुणाल कामराला धक्का, गुन्हे रद्द करण्यास कोर्टाचा नकार!
प. बंगालच्या आसनसोलमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा
दरम्यान, बिजबेहारा येथील गुरी येथील रहिवासी असलेला लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आसिफ याचे घर पाडण्यात आले आहे. दहशतवादी आदिल २०१८ मध्ये कायदेशीररित्या पाकिस्तानला गेला होता, जिथे त्याला दहशतवादी प्रशिक्षण मिळाले. तो गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मीरला परतला होता. घटनेनंतर त्याचा शोध सुरु आहे.