25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषपद्मविभूषण रतन टाटा यांचे निधन

पद्मविभूषण रतन टाटा यांचे निधन

Google News Follow

Related

पद्मविभूषण, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी वयाच्या ८६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनाच्या वृत्तामुळे उद्योग विश्वासह संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.

रतन टाटा हे नियमित तपासणीसाठी ७ ऑक्टोबर रोजी तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांनी याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. मात्र काही तासातच त्यांची प्रकृती खालावली. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

रतन टाटांच्या निधनाचं वृत्त प्रसिद्ध होताच अनेक नेत्यांनी व कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त प्रसिद्ध होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

एटीएसची रत्नागिरीत मोठी कारवाई, पाच संशयिताना अटक

उत्तरप्रदेशमधील तरुणीवर मुंबईत लैंगिक अत्याचार

ज्ञानेश महारावांची चरबी उतरवली!

धक्कादायक! नौशाद आणि हसन अलीकडून चहात थुंकीचा प्रकार!

२८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईत जन्मलेले रतन टाटा उद्योगांसह सामाजिक क्षेत्रातही काम करत आहेत.  रतन टाटा यांच्याकडे एक खरे देशभक्त म्हणून पाहिलं जायचं. रतन टाटा यांनी मार्च १९९१ ते डिसेंबर २०१२ या काळात टाटा समूहाचे नेतृत्व केले. टाटा समूहाला त्यांनी यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवलं. त्यांनी टाटा समूहाला मिठापासून सॉफ्टवेअरपर्यंतची कंपनी बनवली. टाटा समूह आज देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक घराण्यांपैकी एक आहे. टाटा यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्य आणि उद्योग क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.

केवळ उद्योगच नव्हे तर रतन टाटा हे त्यांच्या परोपकारी कार्यासाठीही जगभर प्रसिद्ध आहेत. रतन टाटा यांनी भारतीय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कॉर्नेल विद्यापीठाला एकूण २८ दशलक्ष डॉलर्स दान केले. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय भारतीय विद्यार्थ्यांना मदत होते. याबरोबरच हार्वर्ड बिझनेस स्कूलने विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ५० दशलक्ष डॉलर्स दान केले होते. याशिवाय त्यांनी २०१४ मध्ये IIT बॉम्बेमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी ९५ कोटी रुपयांची देणगी दिली होती. याबरोबरच दरवर्षी ते आपल्या कमाईतील मोठा हिस्सा धर्मादाय कार्यात खर्च करतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा