….म्हणून पद्मश्री गरिकापती नरसिंह राव ‘पुष्पा’च्या दिग्दर्शकाला विचारणार जाब

….म्हणून पद्मश्री गरिकापती नरसिंह राव ‘पुष्पा’च्या दिग्दर्शकाला विचारणार जाब

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘पुष्पा: द राइज’ जगभरात रेकॉर्डब्रेक कामगिरी करत आहे. अल्लू अर्जुनची फॅन फॉलोइंगदेखील वाढत आहे. सर्वजण या चित्रपटाचे आणि अल्लू अर्जुनचे कौतुक करत आहेत, परंतु काही लोक या चित्रपटावर नाराज देखील आहेत. पद्मश्री गरिकापती नरसिंह राव हे देखील त्यापैकीच एक आहेत.

पद्मश्री गरिकापती नरसिंह राव यांनी अल्लू अर्जुनच्या पुष्पाला फटकारले आहे. ते म्हणाले की, अशा चित्रपटांमुळे समाजात अत्याचार वाढतात. हा चित्रपट हिंसेला प्रोत्साहन देत आहे आणि ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एका मुलाखतीदरम्यान नरसिंह राव यांनी या चित्रपटाबद्दल आपले मत मांडले आहे. ‘चित्रपटात स्मगलरला गौरवण्यात आले असून, त्याला नायक म्हटले आहे. तो कोणाला तरी मारतो, गैर कामगिरी करतो आणि प्रेक्षक त्याला हिरो म्हणतात. मी कधी दिग्दर्शक किंवा अभिनेत्याला भेटलो तर मी त्यांना या चित्रपटाबद्दल नक्कीच विचारणा करणार आहे,’ असे नरसिंह राव म्हणाले.

हे ही वाचा:

पुणे इमारत स्लॅब दुर्घटना प्रकरणी चार जणांना अटक

सुरक्षा दलाकडून जम्मू- काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

१९९३ बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड अबू बकरला अटक

दक्षिण कोरियन कंपनी केली मास्कची ‘नाक’बंदी

एखाद्या चाहत्याला प्रेरणा मिळून तो चित्रपटाच्या नायकाप्रमाणे वागू लागला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्नही नरसिंह राव यांनी उपस्थित केला. पद्मश्री विजेत्याने इतर अनेक चित्रपटांवरही टीका केली आहे. मनोरंजनाच्या नावाखाली काहीही केले जात असल्याचे त्यांचे मत आहे.

‘पुष्पा’चे निर्माते किंवा अभिनेत्यांनी अद्याप या टिप्पणीवर प्रतिक्रिया दिलेली नाही. पुष्पा हा चित्रपट एका कुलीची कथा आहे जो नंतर रक्तचंदन तस्करीचा राजा बनतो. चित्रपटाचा दुसरा भाग डिसेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version