सीडीएस बिपिन रावत, प्रभा अत्रे, सोनू निगम पद्म पुरस्काराने गौरवित

सीडीएस बिपिन रावत, प्रभा अत्रे, सोनू निगम पद्म पुरस्काराने गौरवित

हेलिकॉप्टर अपघातात निधन पावलेले भारताचे पहिले सीडीएस बिपिन रावत यांचा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात अनेक नामवंतांची नावे जाहीर करण्यात आली. १२८ जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. भाजपाचे नेते दिवंगत कल्याणसिंह यांनाही पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. भारताच्या लसीकरणात जबरदस्त कामगिरी करणारे सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला यांनाही पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात येईल.

महाराष्ट्रातून प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण या पुरस्काराचा मान देण्यात आला आहे तर बालाजी तांबे, डॉ. हिम्मतराव बावस्कर, गायिका सुलोचना चव्हाण, गायक सोनू निगम, नटराजन चंद्रशेखर आदिंनाही पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

पद्म पुरस्काराने सन्मानित मान्यवर असे-

पद्मविभूषण

सीडीएस बिपिन रावत (मरणोत्तर)

प्रभा अत्रे (कला)

कल्याण सिंह (मरणोत्तर)

राधेश्याम खेमका (मरणोत्तर)

पद्मभूषण

सायरस पुनावाला (व्यापार आणि उद्योग)

नटराजन चंद्रशेखर (व्यापार आणि उद्योग)

सत्या नाडेला

सुंदर पिचाई

गुलाम नबी आझाद

 

पद्मश्री

बालाजी तांबे (मरणोत्तर)

विजयकुमार डोंगरे

सुलोचना चव्हाण (ज्येष्ठ गायिका)

नीरज चोप्रा (ऑलिम्पिक सुवर्णविजेता भालाफेकपटू)

डॉ. हिम्मतराव बावस्कर

सोनू निगम (प्रख्यात गायक)

अनिल राजवंशी

भीमसेन सिंघल

 

पद्म पुरस्कार विजेते क्रीडापटू

देवेंद्र झझारीया – पॅरालिम्पिक – पद्मभूषण

सुमीत अंतिल – पद्मश्री

प्रमोद भगत – पद्मश्री

नीरज चोप्रा – भालाफेक – पद्मश्री

वंदना कटारिया – हॉकी – पद्मश्री

अवनी लेखरा – पद्मश्री

ब्रम्हानंद – फुटबॉल – पद्मश्री

 

Exit mobile version