१०६ जणांना पद्म पुरस्कार.. जाणून घ्या कोण मानकरी

६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण आणि ९१ पद्मश्री

१०६ जणांना पद्म पुरस्कार.. जाणून घ्या कोण मानकरी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २०२३ साठी ३ संयुक्त पद्म पुरस्कारांसह १०६ पद्म पुरस्कारांची घोषणा केली. या यादीत ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण आणि ९१ पद्मश्रींचा समावेश आहे. १९ महिला पुरस्कार विजेत्या आहेत. या यादीमध्ये परदेशी/एनआरआय/पीआयओ/ओसीआय या श्रेणीतील २ व्यक्तींचा समावेश आहे तर ७ मरणोत्तर पुरस्कारप्राप्त व्यक्तींचाही समावेश आहे.

सरकारने ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला १०६ व्यक्तिमत्त्वांना पद्म पुरस्कार जाहीर केले. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन (ORS) चे जनक दिलीप महालानाबिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पश्चिम बंगालमधील डॉ. महालानबीस यांनी ओआरएसचा मोठ्या प्रमाणावर प्रसार केला. एका अंदाजानुसार, यामुळे जगातील ५० दशलक्षाहून अधिक लोकांचे प्राण वाचले. ऑक्टोबर २०२२ मध्ये त्यांचे निधन झाले. दुसरीकडे, तबलावादक झाकीर हुसेन, एसएम कृष्णा आणि श्रीनिवास वर्धन यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुलायमसिंह यादव आणि बाळकृष्ण दोशी यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

बागेश्वर बाबांना नागपूर पोलिसांची क्लीन चीट

बंधुभाव आणला तर स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने होईल साकार

श्याम मानव आणि सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी माफी मागावी

बॉक्सिंग फेडरेशनने निलंबित केलेले असतानाही जय कवळी ऑलिम्पिक संघटनेत कार्यरत कसे?

पद्म पुरस्कार प्रजासत्ताक दिनी दिले जातात
१९५४ पासून, हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनी जाहीर केले जातात. कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वीरांना हा पुरस्कार दिला जातो.

Exit mobile version