बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू झाल्यामुळे हाताला काम मिळेल!

बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू झाल्यामुळे हाताला काम मिळेल!

बैलगाडा शर्यती ही गावांची परंपरा आहे. प्रत्येक सार्वजनिक कार्यात बैलगाड्यांचा वापर होतो. त्यामुळे शर्यतीशिवाय प्रत्येक गाव सुनंसुनं वाटायचं, पण आता सर्व शेतकरी खुश आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनेकांना आता बैलगाडा शर्यतींच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल, अशा शब्दांत भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले.

सांगली येथे या निर्णयानंतर बैलगाडीवर स्वार होत पडळकर शेतकऱ्यांच्या आनंदात सहभागी झाले. गुरुवारी बैलगाडा शर्यतींना काही अटींच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. त्यानंतर महाराष्ट्रात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ते म्हणाले की, बैलगाडा शर्यतींवर बंदी आल्यामुळे या बैलांच्या किमती कमी झाल्या होत्या. २०११ला बैलगाडा शर्यती बंद झाल्या होत्या. त्यामुळे ५० टक्के बैल कत्तलखान्यात गेले. गाईंचं प्रमाणही कमी झालं होतं. आता या निर्णयामुळे बैलांच्या किमती दुपटीनं वाढतील. आता लाखाच्या पटीत बैल विकले जातील. बैलांच्या शर्यती असतात तिथे अनेकांना व्यवसाय उपलब्ध होतो. हारतुरे, भजी, वडे, आइस्क्रीम विकणाऱ्यांना उत्पन्न मिळेल. प्रत्येक बैलगाडीमागे २०-२५ मुले आवश्यक असतात. त्या मुलांना आता हाताला काम मिळेल.

हे ही वाचा:

शरद पवार वाचणार स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र!

धनंजय मुंडेंनी लुटला जगमित्र साखर कारखाना

कर्णबधीरांच्या नावावर ‘हेराफेरी’

महाराष्ट्रात आता बैल धावणार

 

पडळकर यांनी सांगितले की, या बैलगाडा शर्यतींसाठी खिलार जातीचं महत्त्व खूप आहे. हा वंश टिकला पाहिजे, संवर्धन झाले पाहिजे. सगळे शेतकरी म्हणूनच हिरीरीने भाग घेऊन शर्यती सुरू व्हाव्यात यासाठी प्रयत्न करत होतो. खिलार जातीचं महत्त्व आहे. त्यांच्या मूत्राचा अर्क वापरला जातो, तो प्रभावी व गुणकारी आहे. देशातील प्रमुख गाई बैलांत खिलार जातीला महत्त्व आहे.

Exit mobile version