अयोध्येच्या पानविक्रेत्याचा व्यवसाय फळफळला!

प्राणप्रतिष्ठेसाठी मिळाली सर्वांत मोठी ऑर्डर

अयोध्येच्या पानविक्रेत्याचा व्यवसाय फळफळला!

अयोध्येतील हनुमानगढी कॉम्प्लेक्स येथे पानाचे दुकाने चालवणारे सुधीर चौरसिया हे सोमवारी होत असलेल्या राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खूप उत्सुक आहेत. चौरसिया हे गेल्या कित्येक वर्षांपासून रामलल्लाच्या पूजेच्या विधीसाठी पानांचा पुरवठा करत आहेत. परंतु सोमवारचा दिवस त्यांच्यासाठी अनन्यसाधारण आहे. या दिवशी ते त्यांची सर्वांत मोठी ऑर्डर देणार आहेत. प्राणप्रतिष्ठेच्या विधीसाठी गुलकंद आणि अन्य ५० प्रकारचे पदार्थ असणाऱ्या पानांचे ५५१ गठ्ठे ते देणार आहेत.

‘देवाच्या पूजेसाठी दररोजच पाने पाठवली जातात. मात्र सोमवारची ऑर्डर ही आमच्यासाठी सर्वांत मोठी आहे. २३ जानेवारीपासून राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दररोजच्या विधीसाठी १५१ पानांची ऑर्डर दिली होती. यासाठी ट्रस्टतर्फे दररोज चौरसिया यांनी २१०० रुपये दिले जात होते. मात्र आता दररोज ऑर्डर वाढल्यामुळे त्यांना मिळणाऱ्या पैशांतही वाढ होईल, असा विश्वास त्यांना वाटतो.

हनुमानगढी मंदिरापुढे असणाऱ्या दुकानात खुर्चन पेढा विकणारे सुशील गुप्ता यांनाही देवाला प्रसाद देण्याची संधी मिळणार आहे. ‘दररोज सव्वा किलो खुर्चन पेढे देवाला आणि तेवढेच कनक भवनमधील मंदिरात सुपूर्द केले जातात. मात्र सोमवारी, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी आम्ही सव्वापाच किलो पेढ्याची तयारी करत आहोत,’ असे गुप्ता सांगतात. देवाला दाखवल्या जाणाऱ्या प्रसादाची शुद्धता राखण्यासाठी आणखी मेहनत घेतल्याचे ते सांगतात. गुप्ता म्हणाले, “तुम्हाला यापेक्षा मोठा प्रसंगाचा साक्षीदार होण्याची संधी मिळणार नाही, त्यामुळे प्रसादाची शुद्धता सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत काळजी घेतली जात आहे,’ असे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

किती जण ‘एक राष्ट्र एक निवडणुकी’च्या बाजूने?

खोदकामात मिळालेल्या ८४ खांबांनी दिला राममंदिराच्या अस्तित्वाचा पुरावा

मुंबईच्या अटल सेतूवर पहिला अपघात!

चीनमध्ये भूस्खलन होऊन ४० हून अधिक जण गाडले गेले

देवराहा बाबा संस्थानात विशेष लाडूही तयार केले जात असून ते प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अर्पण केले जातील. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींसाठी ‘महाप्रसाद’ तयार केला आहे. ट्रस्टच्या मार्गदर्शनाखाली गुजरातची भगवी सेना ‘भारती गरवी गुजरात’ आणि संत सेवा संस्था यांच्याकडून महाप्रसाद तयार केला जात आहे.

‘भारती गरवी गुजराततर्फे सुमारे २०० जणांच्या चमूने पाच हजार किलोंपेक्षा अधिक सामग्रींचा वापर करून महाप्रसाद तयार केला आहे. शुद्ध देशी तूप, बेसन, साखर आणि पाच प्रकारच्या सुक्या मेव्याचा वापर यासाठी तयार केला जात आहे. महाप्रसादाची शुद्धता सुनिश्चित करण्यासाठी बाजारातील कोणत्याही रेडिमेड पदार्थाचा यात वापर करण्यात आलेला नाही,’ असे संस्थेचे प्रमुख कमलभाई रावल यांनी सांगितले. प्रत्येक प्रसादाच्या पाकिटात दोन लाडू, शरयू नदीचे पाणी, अक्षता, सुपारीची पिशवी आणि पवित्र धागा असेल, असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version