26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषपी व्ही सिंधूची ‘सुवर्ण’ कामगिरी, राष्ट्रकुल स्पर्धेच्या टेबलमध्ये भारताची चौथ्या स्थानी मुसंडी

पी व्ही सिंधूची ‘सुवर्ण’ कामगिरी, राष्ट्रकुल स्पर्धेच्या टेबलमध्ये भारताची चौथ्या स्थानी मुसंडी

पी व्ही सिंधू हिने सरळ सेट्समध्ये कॅनडाच्या खेळाडूवर मात करत राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

Google News Follow

Related

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेचा (Commonwealth Games) आज, ८ ऑगस्ट रोजी शेवटचा दिवस आहे. संपूर्ण स्पर्धेच्या वाटचालीप्रमाणे या दिवशीही भारताची दमदार कामगिरी सुरूच आहे. अखेरच्या दिवशी बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिने भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. पी व्ही सिंधू हिने सरळ सेट्समध्ये कॅनडाच्या खेळाडूवर मात केली आहे. या पदकासह भारताच्या खात्यात आतापर्यंत एकूण ५६ पदकं आहेत.

बॅडमिंटनमधील महिला एकेरीचा अंतिम सामना भारताची पी व्ही सिंधू आणि कॅनडाची मिशेल लीशी यांच्यामध्ये रंगला होता. या लढतीत कॅनडाच्या मिशेल लीशीचा पी व्ही सिंधू हिने २१-१५, २१-१३ असा पराभव केला. या विजयासह भारताने १९ व्या सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

पी व्ही सिंधूने पहिला गेम २१- १५ अशा मोठ्या फरकाने जिंकत सामन्यात आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्येही पी व्ही सिंधूने सामन्यावर पकड ठेवत विजय मिळवला. दुसऱ्या खेळात २१- १३ अशा फरकाने कॅनडाच्या मिशेल लीशीचा सिंधूने पराभव केला. विशेष म्हणजे सिंधूला २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एकदाही अपयश आलेले नाही.

हे ही वाचा:

संजय राऊत २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत

“पाकिस्तानी खेळाडू पदकं जिंकत आहेत हे नेत्यांना माहित आहे का?” पाक पत्रकाराचा सवाल

क्रिकेटमध्ये महिलांची ऐतिहासिक कामगिरी; रौप्यपदकावर कोरलं नाव

अमृता फडणवीस यांना ‘त्या’ गाण्यात का दिसला उद्धव ठाकरेंचा चेहरा

भारताने आतापर्यंत १९ सुवर्णपदकं, १५ रौप्यपदकं, २२ कांस्यपदकं अशी एकूण ५६ पदकं कमावली आहेत. तर या संख्येसह पदतालिकेत भारताने न्यूझीलंडला मागे टाकत चौथ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. या यादीत ऑस्ट्रेलिया १७६ पदकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर १६७ पदकांसह इंग्लंड आहे तर कॅनडा ९२ पदकांसह तिसऱ्या स्थानी आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा