टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू हिने कांस्य पदक मिळवत भारतासाठी आणखीन एका पदकाची कमाई केली आहे. चायनाच्या बिंगजिआओ हिचा पराभव करत सिंधूने कांस्य पदकाच्या सामन्यात विजय मिळवला आहे.
रविवार एक ऑगस्ट रोजी ऑलिम्पिकमध्ये महिला बॅडमिंटनच्या कांस्य पदकाचा सामना रंगला होता. यावेळी भारताचे प्रतिनिधित्व करत खेळणाऱ्या सिंधू समोर चीनची खेळाडू बिंगजिआओ हिचे आव्हान होते. पण ३ सेटच्या या सामन्यांमध्ये पहिले दोन सेट जिंकत सिंधूने मॅच खिशात घातली. सिंधूने पहिला सेट २१-१३ असा जिंकला, तर दुसऱ्या सेटमध्ये २१-१५ असा विजय मिळवला.
हे ही वाचा:
पूर, दरडींनंतर महाडवासियांसमोर आता नवे संकट!
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे काय होणार?
दगडफेक करणाऱ्या दहशतवाद्यांना दणका
राज कुंद्राला ५ महिन्यांनी का अटक झाली?
शनिवार, ३१ जुलै रोजी झालेल्या महिला बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पी.व्ही सिंधू हिचा तैवानच्या ताय त्झु यिंग पी.व्ही सिंधूचा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला होता. पण त्या पराभवाचे कुठलेही दडपण न घेता सिंधूने कांस्य पदकाच्या सामन्यात बहारदार सादरीकरण करत कांस्य पदकावर नाव कोरले.
कांस्य पदक पटकावणारी सिंधू ही पहिली अशी भारतीय महिला ऑलिम्पिकपटू आहे जिच्या नावावर दोन ऑलिम्पिक पदके आहेत. सिंधूच्या या विजयासह भारताच्या नावे दुसरे ऑलिम्पिक पदक जमा झाले आहे. विशेष पाहिजे आत्तापर्यंत भारतासाठी पदक जिंकणाऱ्या दोन्ही खेळाडू या महिला खेळाडू आहेत.