नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीची भयंकर घटना, २२ रुग्णांचा तडफडून मृत्यू

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीची भयंकर घटना, २२ रुग्णांचा तडफडून मृत्यू

राज्यात एकीकडे ऑक्सिजनची कमतरता भासत असताना दुसरीकडे नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याची धक्कादायक दुर्घटना झाली आहे. या ऑक्सिजन गळतीमुळे दुर्घटनेत २२ रुग्ण दगावले आहेत. व्हेन्टिलेटरवर असलेल्या २३ रुग्णांपैकी २२ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला. गलथान कारभारामुळे आपल्या जीवलगांना गमवावे लागल्याचा संताप नातेवाईकांनी व्यक्त केला.

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी १२:३० च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ऑक्सिजन भरण्यासाठी टँकर आला होता. त्यावेळी ही गळती होत असल्याचे लक्षात आले. एकूण १५० रुग्ण या रुग्णालयात होते. आधीच महाराष्ट्रात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा असताना आणि ऑक्सिजनसाठी बाहेरच्या राज्यांतून ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून ऑक्सिजनचे टँकर आणले जात असताना नाशिकच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या ऑक्सिजनच्या भल्यामोठ्या टाकीतून गळती झाली.

गलथान कारभाराचा गंभीर प्रकार या घटनेमुळे उघडकीस आला आहे. रुग्ण दगावले आहेत की नाही यासंदर्भात अधिकृत माहिती कळलेली नाही. ही गळती झाल्यामुळे पंपिग करून रुग्णांना वाचविण्याचा प्रयत्न करावा लागण्यापर्यंत वाईट परिस्थिती ओढवली. हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्सेस इतर आरोग्य कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक यांना धावपळ करून रुग्णाला वाचविण्याची धडपड करावी लागली.

हे ही वाचा:

कोरोनामुळे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप धोक्यात?

गजा मारणे प्रकरणात माजी खासदार संजय काकडेंना अटक

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीचा भयंकर प्रकार; रुग्ण दगावल्याची भीती

जमत नसेल तर पालकमंत्री पद सोडा

मी स्वत: या रुग्णालयात आत जाऊन सर्व बेड चेक केले. यात १६१ रुग्ण हे गंभीर आहेत. तर ३० ते ३५ जण दगावल्याची माहिती मिळत आहे. गेल्या दीड तासापासून ते ऑक्सिजनसाठी तडफडत होते. पण त्यांना ऑक्सिजन न मिळाल्याने ते मृत्यूमुखी पडले आहेत, अशी माहिती शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली.

Exit mobile version