गुरूद्वाराकडून ऑक्सिजन लंगरची सोय

गुरूद्वाराकडून ऑक्सिजन लंगरची सोय

संपूर्ण देशात कोविडचा हाहाकार चालू आहे. देशभरात सध्या ऑक्सिजनची प्रचंड कमतरता जाणवत आहे. अशा वेळेला शिख समुदायाने अनोखा लंगर गाजियाबाद येथे चालू केला आहे. शिख समुदायाने गाजियाबाद येथील एका गुरूद्वारामध्ये चक्क ऑक्सिजन लंगरची सोय केली आहे.

गाझियाबाद गुरूद्वारा प्रबंधक कमिटीचे उपाध्यक्ष गुरप्रीत सिंग यांनी गाजियाबादच्या गुरूद्वारात ऑक्सिजन लंगर सुरू केला आहे. गाझियाबादच्या इंदिरापुरम येथील गुरूद्वारात खालसा हेल्प इंटरनॅशनल या संस्थेच्या सहाय्याने हा उपक्रम चालू करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

कोविड विरूद्धच्या लढाईसाठी सैन्य ‘शस्त्र’ हाती घेणार

मोदी- बायडन यांच्यात कोरोनावर चर्चा

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरणार- टास्क फोर्स

जबाबदारी ढकलणं ही ठाकरे सरकारची ओळख- रावसाहेब दानवे

या लंगरमध्ये रुग्णांना जो पर्यंत हॉस्पिटल बेड मिळत नाही, किंवा गृह विलगीकरणात असलेल्यांचे ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी असेल अशा रुग्णांना ऑक्सिजन पुरवला जाणार आहे.  त्यासाठी या गुरूद्वाराच्या कार्यकर्त्यांनी ९०९७०४१३१३ हा हेल्पलाईन नंबर देखील तयार केला आहे. या क्रमांकावर संपर्क करून आपल्याला ऑक्सिजन सिलेंडर आधीच आरक्षित करून ठेवता येतो. यासाठी गाजियाबादच्या जिल्हाधिकाऱ्याची आणि व्हि के सिंग यांची त्यांना फार मदत झाली. ऑक्सिजन व्यतिरिक्त चाचणी आणि औषधांची सुविधा देखील गुरूद्वारा तर्फे पुरवली जात आहे.

सध्या देशात कोरोनाच्या दुऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून देखील मोठ्या प्रमाणात भारताला सहाय्य मिळत आहे. त्याचप्रमाणे विविध भारतीय संस्था आणि संघटना देखील वेगवेगळ्या मार्गांनी लोकांना कोरोनाविरूद्धच्या लढ्यात सहाय्य करताना दिसत आहेत.

Exit mobile version