25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषऑक्सिजन निर्मिती यंत्रणा थेट जर्मनीहून

ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा थेट जर्मनीहून

Google News Follow

Related

भारतात कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले असताना हवाई दल अनेक तऱ्हेने सहाय्य करण्याक पुढे सरसावले आहे. हवाई दल आता थेट जर्मनीतून ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा आणि ऑक्सिजन वहनासाठी सिलेंडर उचलून आणणार आहे.

सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २३ वहनायोग्य ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा संच भारतातून हवाई मार्गाने आणले जाणार आहेत. त्यानंतर त्यांना देशातील महत्त्वाच्य रुग्णालयांमध्ये बसवण्यात येईल. जेणेमुळे तेथील गरजू लोकांची ऑक्सिजनची मागणी पुर्ण करणे शक्य होईल.

हे ही वाचा:

‘राजेश टोपे यांचे वक्तव्य असंवेदनशील’

हवाई मार्गाने ऑक्सिजन टँकर्सची वाहतूक करण्यास केंद्राची परवानगी

कोविड-१९ वर औषध सापडल्याचा दावा

फ्रान्स भारताच्या पाठिशी सहाय्य करण्यासाठी ठामपणे उभा

त्याबरोबरच भारतात द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनच्या वहनासाठी आवश्यक असलेल्या सिलेंडरची देखील सध्या कमतरता आहे. तो अडथळा देखील विविध मार्गाने दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे कळले आहे.

यापूर्वी भारतीय हवाईदलाने पनागढ येथून काही टँकरची वाहतूक केली होती. त्यामुळे त्याच आधारावर आता देशभरात विविध ठिकाणांसाठी हवाई मार्गाने ऑक्सिजनचे वहन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्राला देखील रिकाम्या ऑक्सिजन टँकर हवाई मार्गाने वाहतूक करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्राणवायूचा तुटवडा कमी होण्यास मदत होण्याची आशा केली जाऊ शकते.

गेल्या काही दिवसात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. भारतात गेल्या २४ तासात ३,३२,७३० नवे रुग्ण आढळून आले, जी जगातील विक्रमी रूग्णवाढ आहे. सलग दुसऱ्या दिवशी ३ लाखापेक्षा अधिक रुग्णवाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भारतातील एकूण रुग्णसंख्या १,६२,६३,६९५ एवढी झाली आहे.

त्याबरोबरच भारताने लसीकरणाचा वेग वाढवायला देखील सुरूवात केली आहे. भारतात पूर्वी केवळ कोविशिल्ड आमि कोवॅक्सिन या दोनच लसींच्या आधारे लसीकरण केले जात होते. आत्तापर्यंत लसीकरणाची वयोमर्यादा ४५ होती. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना सरसकट लस दिली जाणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा